Tamannaah Bhatia Birthday : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री तमन्ना भाटियाचा (Tamannaah Bhatia) वाढदिवस आहे. दक्षिणात्य (Tollywood) चित्रपटात प्रसिद्धी मिळवल्यानंतर तमन्नाने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे. अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. यादरम्यान तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, मात्र तमन्नाने दक्षिणेतील बड्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव समाविष्ट केले. तमन्नाचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी ती साऊथची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री एका चित्रपटासाठी दीड ते दोन कोटी रुपये घेते. तिच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, अहवालानुसार तमन्नाकडे 15 दशलक्ष म्हणजे सुमारे 110 कोटींची संपत्ती आहे.


तमन्नाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. तिच्या वडिलांचे नाव संतोष भाटिया असून ते हिरे व्यापारी आहेत, आईचे नाव रजनी भाटिया आणि गृहिणी आहे. तमन्नाचे सुरुवातीचे शिक्षण माणक जी कूपर एज्युकेशनल ट्रस्ट स्कूल, जुहू येथे झाले. वयाच्या 13 व्या वर्षी तमन्ना तिच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात तिने परमॉर्फेन्स केला. त्यानंतर तिला या चित्रपटाची ऑफर आली.


यानंतर तमन्ना एक वर्ष मुंबईतील पृथ्वी थिएटरचा भाग होती. दरम्यान, 2005 मध्ये रिलीज झालेल्या गायक अभिजित सावंतच्या 'लफजो में' या अल्बममध्येही तिने काम केले. तमन्नाने काही काळ मॉडेलिंग आणि काही टीव्ही जाहिरातीमध्ये तमन्नाने काम केलं. तमन्नाने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाचे नाव होते 'चांद सा रोशन चेहरा'. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला.


यानंतर 2013 मध्ये तमन्नाने हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. ती 'हिम्मतवाला' चित्रपटात अजय देवगणसोबत दिसली होती. त्यानंतर 2014 मध्ये 'हमशकल्स' चित्रपटात काम केले. तिने अक्षयसोबत 'एंटरटेनमेंट' या पुढच्या चित्रपटात काम केले. या दोन्ही चित्रपटांमध्ये तमन्ना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. पण तिला ओळख मिळाली ती सुपरहिट 'बाहुबली' चित्रपटामधून. त्यानंतर तमन्नाचा चाहतावर्ग कमालीचा वाढला.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha