Kazakhstan Forests Fire:  कझाकस्तान (Kazakhstan) या देशाच्या जंगलांमध्ये सध्या आग्नितांडव (Forests Fire) सुरु आहे. या आगीमुळे अनेक पशु-पक्ष्यांचा जीव गेला आहे. तर काही मानवी वस्ती देखील बरखास्त झाल्या आहेत. आतापर्यंत या आगीमध्ये 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच सध्या आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. अग्निशमन दलाची जवळपास एक हजार पथकं ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. 


कझाकस्तानच्या आपत्कालीन विभागाच्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तर-पूर्व भागातील जंगलांमध्ये ही आग लागली आहे. या आगीमध्ये जवळपास 60,000 जंगलाचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. यामध्ये अनेक झाडे, पशु-पक्षी, मानवी वस्ती जळून खाक झाल्या आहेत. तसेच तिथे अडकलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा देखील शोध सुरु आहे. या आगीमधून आतापर्यंत 316 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. परंतु उच्च तापमान आणि हवेची दिशा बदलल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. 


वीज पडल्यामुळे लागली आग


यूएनआय या संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काही घरांपर्यंत ही आग थांबण्यात आली आहे. शनिवारी कझाकस्तानचे राष्ट्रपती कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाचे मंत्री युरी इलिन यांची हकालपट्टी देखील केली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गुरुवारी वीज पडल्याने जंगलात ही आग लागली. आतापर्यंत जवळपास 1000 लोक ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. 






रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी व्यक्त केला शोक


या आगीमध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. यावर रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांनी कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांच्याजवळ दु:ख व्यक्त केलं आहे. 


कझाकस्तान हा देश आधी युरेशियामध्ये होता. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील नववा सर्वात मोठा देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ 2,74,900 घन चौरस आहे. आधी हा देश सोव्हिएत युनियनचा हिस्सा होता. परंतु 1991 सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन कझाकस्तान हा स्वतंत्र देश निर्माण झाला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Russia Ukraine War: संघर्ष अजूनही सुरुच, युक्रेनकडून रशियाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात