मुंबई : जुगाड, चमचा, सूर्य नमस्कार यासारख्या रोजच्या वापरातील 70 भारतीय शब्दांचा समावेश जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये वडा, गुलाबजाम, खीमा यासारख्या खाद्यपदार्थांचाही समावेश आहे.


तेलुगू, उर्दू, तमिळ, हिंदी आणि गुजराती भाषेतील 70 भारतीय शब्दांना ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या नव्या आवृत्तीत स्थान देण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात डिक्शनरीत या नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला.

अन्ना, अच्छा, बापू, बडा दिन, बच्चा, जुगाड, चमचा, सूर्य नमस्कार, गुलाबजाम, खीमा, मिर्च, नमकीन या शब्दांचा नव्याने समावेश झाला आहे.

यापूर्वी Anna या स्पेलिंगने 'आणा' (रुपयाचा 1/16 भाग) हा शब्द डिक्शनरीत होता, मात्र आता मोठा भाऊ या अर्थाने दुसरा शब्दही समाविष्ट करण्यात आला आहे.

दरवेळी विविध भाषांमधले नवनवीन शब्द, स्थानिक शब्द यांची भर ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या नव्या आवृत्तीत घातली जाते. दर तीन महिन्यांनी नवीन शब्दांचा समावेश शब्दकोषात होतो. एखादा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट करण्यासाठी किमान दहा वर्ष संबंधित भाषेत वापरात असावा लागतो.

काही प्रमुख शब्द

अन्ना
बडा दिन
बापू
बस
भवन
भिंडी
चाचा
चक्का जाम
चमचा
चौधरी
छी-छी
चूप
दादागिरी
देश
देवी
दीदी
दिया
दम
फंडा
गोष्त
गुलाबजाम
गली
हाट
जय
झुग्गी
जी
जुगाड
खीमा (कीमा)
कुंड
महा
मिर्च
मिर्च मसाला
नगर
न्हाई
नमकीन
नाटक
निवास
किला
सेवक
सेविका
टप्पा
टाईमपास
उद्योग
वडा