ICC Cricket World Cup 2023 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. युवा सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill Health update ) याच्या प्रकृतीमध्ये सुधारणार आहे. शुभमन गिल आज अहमदाबादला रवाना होणार (Shubman Gill will be travelling to Ahmedabad today) आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील (IND vs AUS) सामन्याआधी शुभमन गिल डेंग्यूने बेजार झाला होता. त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले. भारतीय संघ (Team india) चेन्नईतून दिल्लीत शुभमन शिवाय दाखल झाला. शुभमन गिल याने चेन्नईमध्ये उपचार घेतले. 


मिळालेल्या वृत्तानुसार, शुभमन गिल याच्या प्रकृतीमध्ये (Shubman Gill Health update ) चांगली सुधारणा झाली आहे. तो चेन्नईतून आज अहमदाबादला रवाना झाला आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर सामना होणार आहे. त्यासाठी गिल अहमदाबादला रवाना झाला आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम (BCCI medical team) शुभमन गिल याच्यावर लक्ष ठेवून आहे, त्याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणार आहे. पाकिस्तानविरोधात शुभमन गिल मैदानावत उतरणार का? याकडे सर्वच भारतीय चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. वर्षभरापासून शुभमन गिल भन्नाट फॉर्मात आहे. गिलची अनुपस्थिती भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरोधात प्रकर्षाने जाणवली, त्यामुळे गिलच्या कमबॅककडे सर्वच क्रीडा प्रेमी नजरा लावून बसले आहेत. 






फलंदाजी कोच काय म्हणाले ?


भारतीय संगाचे फलंदाजी कोच विक्रम राठौड यांनी शुभमन गिल याच्या हेल्थ अपडेटबद्दल माहिती दिली. शुभमन गिल डेंग्यूच्या आजाराचा सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय तो चेन्नईमध्येच उपचार करत असल्याचेही सांगितले. शुभमन गिल याला चेन्नईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर तो हॉटेलमध्ये परतला. त्याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा आहे. बीसीसीआय मेडिकल पथक त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन आहे. 
 
अफगाणिस्तानविरोधीतल सामन्यापूर्वी फलंदाजी कोचने गिलच्या हेल्थविषयी अपडेट सांगितली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, शुभमन गिल याची प्रकृती वेगाने सुधारत आहे. काळजीमुळे त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. तो हॉटेलमध्ये परतला आहे. मेडिकल टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.  तो लवकरच मैदानात परतेल, अशी आशा आहे. 


भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिल याला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याआधी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधात तो मैदानात उतरु शकला नाही. गिलच्या जाही ईशान किशन याला संधी देण्यात आली होती. पण पहिल्याच सामन्यात ईशान किशन शुन्यावर बाद झाला. शुभमन गिल याने मागील वर्षभरात खोऱ्याने धावा काढल्या आहेत. फॉर्मात असणारा गिल संघात नसल्याची कमी भारतीय संघाला जाणवत आहे.