Israel Airstrike : सध्या गाझा पट्टी, पूर्व जेरुसलेम आणि इस्रायल हा सततच्या होणाऱ्या स्फोटांनी हादरतोय. इस्रायलचं सैन्य आणि गाझा पट्टीवर नियंत्रण असलेला पॅलेस्टिनी कट्टरपंथीय गट हमास पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. यातच आज इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील AP अर्थात असोसिएट प्रेस, अल जजीरा सह इतर मीडिया ऑफिसेसचं प्रचंड नुकसान झाले आहे. येथील इमारती अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. 


 





इस्राईलच्या मिलिट्रीने गाझा शहरातील काही इमारती खाली करण्याचा इशारा दिला होता. याच परिसरात असोसिएट प्रेस आणि इतर मीडियाच्या इमारती आहेत. त्यानंतर तासाभरात याठिकाणी इस्राईलने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात 12 मोठ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. मात्र या ठिकाणच्या हल्ल्यामागचं  अधिकारीक स्पष्टीकरण इस्रायलने अद्याप दिले नाही.




BLOG | इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा मागोवा


याआधी शनिवारी गाझा शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या निर्वासितांच्या छावणीवर इस्त्रायलने हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 


Israel : इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला, हमासच्या हल्ल्याला इस्रायलचं जशास-तसं उत्तर, गाझा पट्टीवर बॉम्बचा वर्षाव सुरु


इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला


 पॅलेस्टाईनमधील दहशतवादी गट असलेल्या हमासकडून इस्रायलवर गेल्या पाच-सहा दिवसात हजारो रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत. त्यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाल्याचा दावा इस्रायलने केला असून आता हमासला जशास-तसं उत्तर दिलं आहे. इस्रायलनेही गाझा पट्टीवर प्रतिहल्ला करुन हमासच्या 11 कमांडरना मारल्यांचं वृत्त आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात 70 पॅलेस्टिनी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आता पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 


गेल्या तीन दिवसांपूर्वी जेरुसलेम तीन मोठ्या स्फोटांनी हादरलं होतं. जेरुसलेमच्या वेस्ट वॉलजवळ ज्यू धर्मीय प्रार्थना करत असताना हमासकडून रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यामध्ये नऊ मुलांसह 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी होती. जेरुसलेम मधील अल-अक्सा मशिदीजवळ इस्रायल पोलीस आँणि पॅले्स्टिनी नागरिकांच्यात झटापट झाली होती.