Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास संघर्ष सुरुच; हजारो लोकांचा बळी

Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Oct 2023 11:10 AM
Israel-Hamas War Death Toll : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 9500 लोकांचा मृत्यू 

Israel-Hamas War Live Updates : इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत सुमारे साडेनऊ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हमास संचालित गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार, युद्धात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत आठ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. त्याचबरोबर इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हमासने अजूनही 200 हून अधिक इस्रायली लोकांना बंदी बनवलं आहे.

Israel-Hamas War Live Updates : अमेरिकेचा इस्रायलला इशारा दिला

युद्धात अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा असला तरी, अमेरिकेने इस्रायलला इशारा दिला आहे. हमासचे सैनिक आणि नागरिक यांच्यात फरक करून निष्पाप गाझा रहिवाशांचे संरक्षण केले पाहिजे, असा इशारा अमेरिकेने इस्रायलला दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सांगितले की, तेल अवीवला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार असला तरी, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या अनुषंगाने जे नागरिकांच्या संरक्षणास प्राधान्य देणे आवश्यक आहे. बायडन यांनी नेत्यानाहू यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला.

Israel-Hamas War Live Updates : इस्रायल हमास युद्धात 3000 हून अधिक बालकांचा मृत्यू

इस्रायल गाझावर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. या सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर झाला आहे. सेव्ह द चिल्ड्रनने दिलेल्या माहितीनुसार, हमास आणि इस्रायली यांच्या युद्घात 3,195 मुलांचा मृत्यू झाला आहे. 7 ऑक्टोबरपासून हा संघर्ष सुरु आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूची संख्या 2019 पासून दरवर्षी जगभरातील संघर्षांमध्ये मारल्या जाणाऱ्या एकूण मुलांपेक्षा जास्त आहे. मात्र, ही संख्या याहूनही अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही 1000 मुले बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

Israel Hamas War Update : इस्रायलकडून गाझा पट्टीतील हल्ले तीव्र

Israel Hamas War Update : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी, तरी हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हमासने इस्रायलवर हल्ला करत या युद्धाला सुरुवात केली. त्यानंतर इस्रायलने युद्धात उतरत हमासचा नायनाट करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे इस्रायलकडून गाझा पट्टीतील हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. 

Israel-Hamas War Death Toll : हमास इस्रायल युद्धात 9500 लोकांचा मृत्यू

Israel-Hamas War Live Updates : इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत सुमारे साडेनऊ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हमास संचालित गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार, युद्धात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत आठ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. त्याचबरोबर इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हमासने अजूनही 200 हून अधिक इस्रायली लोकांना बंदी बनवलं आहे. 

Israel-Hamas War Live Updates : हमासकडे 240 इस्रायली ओलिस

इस्रायल सैन्याच्या प्रवक्याने दिलेल्या माहितीनुसार, हमासने सुमारे 240 इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवलं आहे.

पार्श्वभूमी

Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.