तेल अवीव (इस्त्रायल) : फक्त देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला धडकी भरवणारी जगातील सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा असलेली 'मोसाद' सारखी गुप्तचर संस्था, अत्याधुनिक शस्त्रत्रांनी सज्ज असलेली लष्करी बळ आणि सोबतीला तितकीच हायटेक यंत्रणा असताना इस्राईलमध्ये हमासने घुसखोरी करून केलेल्या हल्ल्याने अवघ्या जगात सनसनाटी निर्माण केली आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन हा संघर्ष इस्रयल देशाच्या स्थापनेपासूनच आहे. आजपर्यंत तो संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला हजारो वर्षांची धार्मिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. इतक्या भयंकर परिस्थितीमध्येही इस्त्रायलची सज्जता जगाला नेहमीच दिसून आली. देशावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा मोसाद नेहमीच धावून आली. मात्र, देशात अंतर्गत यादवी सुरु असतानाच हमासने घुसून केलेला हल्ला हा मात्र त्यांच्या वर्मावर बोट ठेवणारा आहे.
नेत्यानाहू सरकार विरोधात देश रस्त्यावर, लष्करातही नाराजी
इस्रायल हा गेल्या वर्षभरापासून अंतर्गत यादवीने पोळून निघाला आहे. विद्यमान बेंजामिन नेत्यानाहू सरकार विरोधात संपूर्ण यंत्रणा, सामान्य नागरिक, लष्करातील काही अधिकारी सुद्धा बंड करून रस्त्यावर उतरले होते. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलमध्ये सणवार सुरु असल्याने सुट्टीचे दिवस सुरु आहेत. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा घेत हमासने इस्रायलवर एका आघाडीवर नव्हे तर बहुआघाडीवर जमीन, हवेतून, समुद्रातून चौफेर हल्ला केला. एकावेळी पाच हजार रॉकेट इस्रायलच्या दिशेने डागण्यात आली. यामध्ये शेकडो इस्रायलींचा मृत्यू झाला. हजारांवर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सैनिकांसह नागरिकांचे सुद्धा अपहरण केल्याची चर्चा इस्राईल माध्यमांमध्ये आहे.
इस्त्रायलमध्ये सध्या काय घडतंय?
- इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर हमास आणि इस्रायली सैन्य यांच्यात दक्षिण इस्रायलमधील अनेक भागात जोरदार लढाई सुरू आहे.
- हिजबुल्लाहने लेबनॉनमधून वादग्रस्त शेबा फार्मवर मोर्टार हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांनी तोफखान्याने प्रत्युत्तर दिले आहे.
- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वेढा घातलेल्या पॅलेस्टिनी एन्क्लेव्हला “ओसाड बेट” मध्ये बदलण्याची धमकी दिल्यानंतर गाझावरील जमिनीवर आक्रमणाची भीती वाढत असताना हिजबुल्लाहकडून हल्ला.
- आरोग्य अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार 313 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, किमान 600 इस्रायली मृत्यूमुखी पडले आहेत.
- इस्रायली हल्ले, पूर्व जेरुसलेममधील अल-अक्सा मशीद कंपाऊंडमध्ये वाढलेला तणाव, विक्रमी संख्येने पॅलेस्टिनी मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर हमासची हस्त्रायलवर हल्ला.
गेल्या 50 वर्षातील सर्वात मोठा हल्ला
इस्रायलवर पॅलेस्टिनी गट हमासने अचानक हल्ला केला. डोजरने कुंपण मोडून टाकून बंदूकधारी इस्त्रायलमध्ये घुसले. त्यानंतर गाझामधून रॉकेट डागण्यात आली. सिमचॅट तोराहच्या ज्यू सुट्टीवेळी पहाटे हल्ला झाला. इजिप्शियन आणि सीरियन सैन्याने 1967 मध्ये संघर्षादरम्यान योम किप्पूरच्या ज्यू सुट्टीवेळी केलेल्या हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला आहे. हमासने दक्षिण इस्रायलमध्ये रॉकेट डागली आणि तेल अवीव आणि बीरशेबापर्यंत सायरन ऐकू आले. हमासने सुरुवातीच्या बॅरेजमध्ये 5,000 रॉकेट सोडले. इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार 2,500 रॉकेट डागण्यात आले. इस्रायली निवासी भागात धुराचे लोट पसरले आणि सायरन वाजल्याने लोकांनी इमारतींच्या मागे आश्रय घेतला.
दुसरीकडे, गाझा आणि इस्रायलला वेगळे करणार्या सुरक्षा कुंपणातून हमास फायटरांनी प्रवेश केला. एक हमास फायटर पॉवर पॅराशूटमधून उडताना व्हिडिओमध्ये शूट झाला. सैनिकांना घेऊन जाणारी एक मोटारबोट झिकिम या इस्रायली किनारपट्टीवर लष्करी तळ असलेल्या शहराकडे जाताना दिसली.
इस्त्रायलच्या सीमावर्ती शहरात हल्ले
इस्रायली माध्यमांच्या म्हणण्यानुसार, हमासने इस्रायली शहर Sderot, आणखी एक समुदाय Be'eri आणि गाझापासून 30km (20 मैल) पूर्वेकडील Ofakim शहरावर हल्ला केला. त्यानंतर इस्रायली सैन्याने हमासने घेरलेल्या भागाला वेढा देत शोधमोहीम सुरु केली.
इतर महत्वाच्या बातम्या