Israeli Airstrike At Gaza Hospital : इस्रायल-हमास युद्ध (Israel Hamas War) चा आज 12 वा दिवस आहे. हमास आणि इस्रायलकडून एकमेकांवर सातत्याने हल्ले सुरुच आहेत. आता इस्रायलकडून गाझामधील रुग्णालयावर एअरस्ट्राईक केल्याचा दावा हमासने केला आहे. हमासने म्हटलं आहे की, 17 ऑक्टोबरला रात्री 10 वाजेच्या सुमारास इस्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयावर हल्ला केली. या एअरस्ट्राईकमध्ये 500 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलने रुग्णालयावर एअरस्ट्राईक केल्याचा हमासचा दावा
एपीच्या वृत्तानुसार, हमास संचालित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, इस्रायलने गाझा पट्टीतील एका रुग्णालयाला हवाई हल्ला केला आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात जवळपास 500 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा हमासकडून करण्यात आला आहे. गाझाच्या खान युनूस अल-अहली या रुग्णालयावर इस्रायलने एअरस्ट्राईक केल्याचा दावा हमासकडून केला जात आहे.
ज्यूंना मारणे हे हमासचे एकमेव लक्ष्य : पंतप्रधान नेतान्याहू
जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमासच्या कृतींमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत आहेत. हमास दुहेरी युद्ध गुन्हे करत आहे. हमास केवळ नागरिकांची हत्या करत नाहीत, तर त्या नागरिकांना ओलीस ठेवत आहेत आणि स्वत:च्या संरक्षणासाठी त्यांचा वापर करत आहेत.
इस्रायलकडून रुग्णालयांवर हल्ले
इस्रायलच्या एअरस्ट्राईकमध्ये रुग्णालयांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप हमासकडून करण्यात येत आहे. मंगळवारी गाझातील रुग्णालयावर इस्रायलने एअरस्ट्राईक केल्याचा दावा हमासने केला आहे. या हल्ल्यात 500 जण मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे. गाझातील रुग्णालये अनेक नागरिकांसाठी निवारा आहे, त्यामुळे रुग्णालयात मोठ्या संख्येने नागरिक आहेत. यामुळेच इस्रायलच्या हल्ल्यात शेकडो जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या हमासवरील एअरस्ट्राईकचा दावा खरा ठरल्यास हा 2008 नंतरचा सर्वात घातक इस्रायली हमाई हल्ला असेल.
बायडेन बुधवारी इस्रायल दौऱ्यावर
इस्रायल हमासमधील युद्धाच्या काळात काही देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत, अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनसारख्या काही देशांनी इस्रायलला समर्थन दिलं आहे. महासत्ता अमेरिका युद्धात इस्रायलच्या बाजूने उभी आहे. या युद्धाच्या काळात अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री इस्रायलला भेट देऊन गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, हमासच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी बुधवारी, 18 ऑक्टोबरला इस्रायलला भेट देणार आहेत.
युद्धात 4700 हून अधिक मृत्यूमुखी
हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धात 4700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना अद्याप वाचवता आले नसल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :