US President Joe Biden on Israel Hamas War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी हमासला (Hamas) इशारा दिला आहे. हमासला संपवून टाकू, असं म्हणत राष्ट्राध्यक्ष बायडन कडाडले आहेत. तर गाझावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न इस्रायलनं अजिबात करु नये, असा सल्लाही अमिरेकेनं इस्रायलला दिला आहे. एवढंच नाहीतर इस्त्रालय हमास वादात ढवळाढवळ करणाऱ्या इराणलाही अमेरिकेनं स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. 


इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्य केली आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी बोलताना, हमासचा नायनाट करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. तसेच, पॅलेस्टिनी राज्याचा मार्गही मोकळा झाला पाहिजे, असंही जो बायडन यांनी स्पष्ट म्हटलं आहे.  


हमासचा खात्मा करणं आवश्यक : जो बायडन 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, हमासचा खात्मा करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु, एका पॅलेस्टिनी राज्याचीही गरज आहेच. तसेच, गाझा ताब्यात घेणं ही इस्रायलची चूक ठरेल, मात्र हमासला तिथून हाकलून देणं आवश्यक आहे, असंही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. 


जो बायडन यांचा इस्रायललाही इशारा 


गाझावर पुन्हा एकदा कब्जा करणं ही इस्रायलची सर्वात मोठी चूक ठरेल, असं म्हणत जो बायडन यांनी इस्त्रायला सर्वात मोठा सल्ला दिली आहे. दरम्यान, 1967 च्या मध्यपूर्व युद्धात इस्रायलनं वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेमवर कब्जा केला होता.


जो बायडन यांचा इराणलाही इशारा


याशिवाय जो बायडन यांनी इस्त्रालय हमास वादात ढवळाढवळ करणाऱ्या इराणलाही इशारा दिला. ते म्हणाले की, इराणनं हे युद्ध वाढवण्याचं काम करू नये. यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन यांनी आपला देश कारवाई करू शकतो, असा इशारा दिला होता. इराण केवळ निरीक्षक राहू शकत नाही, असं ते म्हणाले होते. युद्धाची व्याप्ती वाढल्यास अमेरिकेलाही मोठा फटका बसेल, असा इशाराही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला होता.


इस्रायल-पॅलेस्टिनी युद्ध सुरुच


गाझा येथे इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत 2215 पॅलेस्टिनींना आपला जीव गमावला आहे, जखमींची संख्या 8,714 आहे. मृतांमध्ये 700 मुलांचाही समावेश आहे. वेस्ट बँकमध्ये आतापर्यंत 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मृतांची संख्या 1300 वर पोहोचली आहे, तर 3400 लोक जखमी आहेत. 14 ऑक्टोबरपर्यंत इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Israel Hamas War : इस्त्रायल-हमासच्या युद्धात भारतीय वंशाच्या तीन महिला मृत्यूमुखी, दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्रातील किम डोकरकर धारातिर्थी