Iran : जगभरातील लोक महिला-पुरुष समानता या विषयी चर्चा करतात. काही देशांमध्ये महिला या प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत तर काही देशांमध्ये महिलांना साधे मूलभूत हक्क देखील मिळत नाहीयेत. काही दिशांमध्ये महिलांवर नियम लादण्यात आले आहेत. या नियमांमुळे महिलांना त्यांना हवं तसं आयुष्य जगता येत नाही. आता महिलांसाठी इराणी (Iran) सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या दबावानंतर आता इराण सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. इराणी महिला तेहरानमधील स्टेडियममध्ये फुटबॉलचा सामना पाहू शकल्या. इराणच्या सरकारनं जवळपास 40 वर्षांपूर्वी घातलेली बंदी हटवली आहे. 


गुरुवारी (25 ऑगस्ट) इराणची राजधानी तेहरान येथील आझादी स्टेडियममध्ये इराणमधील महिलांनी फुटबॉलची मॅच पाहण्यासाठी गर्दी केली. या समान्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये अनेक महिला सामना पाहताना दिसत आहेत. एस्तेगलाल एफसीच्या ट्विटर अकाऊंटवरुन सामना पाहणाऱ्या महिलांचा एक फोटो शेअर करण्यात आला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही आझादी स्टेडियममध्ये उपस्थित आहात याचा आम्हाला आनंद आहे.”






40 वर्षांपूर्वीची बंदी हटवल्यानंतर महिलांनी पाहिला फुटबॉलचा सामना 
आंतरराष्ट्रीय फुटबॉलची संस्था फिफा आणि आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन (एएफसी) यांनी इराणी अधिकाऱ्यांना दिलेल्या एका संयुक्त पत्रात महिलांना लीग सामना पाहण्याची परवानगी देण्याचे आवाहन इराणी सरकारकडे केले होते. त्यानंतर त्याला इराणी सरकारनं परवानगी दिली. 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीनंतर महिलांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. आता जवळपास चाळीस वर्षांनंतर इराणमधील महिलांनी स्टेडियममध्ये बसून फूटबॉलचा सामना पाहण्याचा आनंद लुटला. 
  
काही मिनीटांमध्ये विकली गेली तिकीटे
एका वृत्तानुसार, या सामन्याची महिलांसाठी आरक्षित 3500 तिकिटे एका तासापेक्षा कमी कालावधीत विकली गेली. आझादी स्टेडियममधील प्रेक्षकांची आसनक्षमता ही सुमारे एक लाख आहे. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये 150 हून अधिक महिला पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली होती.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: