Racist Attack on Indian American Women: अमेरिकेतील टेक्सास (Texas) येथे चार भारतीय वंशाच्या महिलांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  अमेरिकन-मेक्सिन महिलेनं (Mexican Women) भारतीय वंशाच्या चार महिलांना शिविगाळ केली. टेक्सासच्या (Texas) रस्त्यावर फिरणाऱ्या चार भारतीय महिलांसोबत अमेरिकन-मेक्सिन महिलेनं (Mexican Women) गैरवर्तन केलं. भारतीय महिलांना शिविगाळ केलीच...त्याशिवाय त्यांना मारहाण केल्यानंतर बंदूक दाखवून गोळ्या घालण्याची धमकीही दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. पोलिसांनी (Mexican Police) आरोपी महिलेला अटक केली आहे. 


व्हिडीओत महिला भारतीय वंशाच्या महिलांबाबात अपशब्द (Abusive Words)  वापरत असल्याचं दिसत आहे. अमेरिकन-मेक्सिन महिला भारतीय वंशाच्या महिलांना परत आपल्या देशात जाण्यास सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही घटना बुधवारी रात्री टेक्सासच्या डलास (Dallas) येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत शिविगाळ करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. 


व्हिडीओत महिलेनं स्वत:ला अमेरिकन-मेक्सिन असल्याचं सांगत आहे. या व्हिडीओत महिला भारतीय महिलांवर हल्ला केल्याचं दिसत आहे. भारतीय महिलांबाबत शिविगाळ आणि अपशब्द वापरल्याचंही व्हिडीओत दिसतेय.  ‘‘मला भारतीयांचा तिरस्कार आहे. सर्व भारतीय चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत येतात.’’ असे व्हिडीओत ती महिला भारतीय महिलांना म्हणत असल्याचं दिसतेय. 


पाहा व्हिडीओ -






महिलेला अटक करेल्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. आरोपी महिलेनं सांगितलं की, तिचा जन्म अमेरिकेत झाला; ती जिथं जाते तिथं तिला भारतीय दिसतात. जर भारतात जीवन चांगलं आहे, तर तुम्ही लोक इथं का आलात? आरोपी मेक्सिकन-अमेरिकन महिलेचं नाव एस्मेराल्डा अप्टन (Esmeralda Upton) असं आहे. एस्मेराल्डावर वांशिक हल्ला आणि धमकी देण्याचं कलम लावण्यात आलंय. एस्मेराल्डाला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आलाय. वास्तविक, प्लानो आणि डॅलसमधील अंतर फक्त 31 किलोमीटर आहे.