China Company Punishment For Employees : जगभरातील कोणताही श्रीमंत व्यक्ती असो वा गरीब, त्याला कामाचं टेन्शन असतं. कामाच्या व्यापातून सुटलेला असा व्यक्ती क्वचितच पाहायला मिळतो. व्यावसायिक असो वा कर्मचारी कामाचं टेन्शन प्रत्येकालाचं असते. त्यातल्या त्या कर्मचाऱ्यांसाठी हा व्याप अधिक असतो, कारण काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी टार्गेट असतात. हे टार्गेट पूर्ण करणं गरजेच असते. या टार्गेटवरच त्यांची पगारवाढ आणि प्रमोशन अवलंबून असतं. पण जर हे टार्गेट पूर्ण न केल्यास तुम्हाला कंपनीनं शिक्षा दिली तर...? चीनमधील एका कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना (Employees) अशीच शिक्षा (Punishment) दिली जात आहे.


'टार्गेट पूर्ण नाही झालं तर खावी लागतील कच्ची अंडी'


चीनमधील एका कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी दिलेले टार्गेट पूर्ण न केल्यास त्यांनी विचित्र शिक्षा दिली जाते. या अजब शिक्षेची चर्चा सध्या जगभरात होताना दिसत आहे. चीनमधील झेंगझाऊ टेक कंपनीकडून (Zhengzhou Tech Company) कर्मचाऱ्यांना कच्ची अंडी विचित्र शिक्षा देण्यात येत आहे. या कंपनीच्या एका इंटर्नने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. या कर्मचाऱ्याने सांगितलं की, झेंगझाऊ टेक कंपनीमध्ये टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं कच्ची अंडी खायाला लावतात. या कंपनीतील एका इंटर्नने सांगितलंय की, कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी विचित्र नियम लागू करण्यात आले आहेत.  चांगली कामगिरी न करणाऱ्या किंवा टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कच्ची अंडी खाण्याची शिक्षा दिली जाते.


इंटर्नला सोडावी लागली इंटर्नशीप


सोशल मीडियावर व्यथा मांडणारा हा इंटर्न एक विद्यार्थी आहे. हा कर्मचारी झेंगझाऊ टेक कंपनीमध्ये (Zhengzhou Tech Company) इंटर्न म्हणून रुजू झाला. कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी विचित्र नियम लागू करण्यात आले आहेत.  चांगली कामगिरी न करणाऱ्या किंवा टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कच्ची अंडी खाण्याची शिक्षा दिली जाते. पण टार्गेट संबंधित हे विचित्र नियमाचं पालन करण्यास त्यानं नकार दिला. यामुळे त्याला इंटर्नशिप वरून काढून टाकण्यात आलं. यासाठी कंपनीला जबाबदार धरण्याऐवजी व्यवस्थापनानं वैयक्तिक कारणं सांगत त्यांच्यावर इंटर्नशिप सोडण्यासाठी दबाव आणला.


कच्ची अंडी खाल्ल्याने कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली


इंटर्नने सांगितलं की, कंपनीकडून कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं कच्ची अंडी खाण्यास भाग पाडलं जातं. कच्ची अंडी खाल्ल्याने अनेक कर्मचाऱ्यांना उलट्या होतात. बहुतेक कर्मचाऱ्यांची तब्येतही बिघडली पण कंपनी व्यवस्थापनाला याची अजिबात पर्वा नाही. या शिक्षेवर कोणत्याही कर्मचाऱ्यानं प्रश्न उपस्थित केला तर कच्ची अंडी खाण्यास कोणत्याही कायद्याने बंदी नाही, असं एचआर (HR) सांगतो. 


टेक कंपनीवर नेटकऱ्यांची टीका 


चिनी कंपनीने कर्मचाऱ्यांना कच्ची अंडी खायला लावल्याच्या शिक्षेवर सोशल मीडियावर बरीच टीकाही सुरू झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी हे वर्तन अतिशय अमानवीय असल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर जिनशुई जिल्ह्यातील कामगार तपासणी ब्रिगेडनं तपास सुरू केला आहे. सेल्ससाठी कर्मचारी जबाबदार आहे. त्यामुळे सेल्समुळे जर कर्मचाऱ्याला बोनस मिळालं, तर कमी सेल्स झाल्यास त्यांना शिक्षेलाही सामोरं जावं लागेल, असं कंपनीच्या व्यवस्थापनानं म्हटलं आहे.