Vasundhara Oswal : भारतीय वंशाचे उद्योगपती पंकज ओसवाल यांनी युंगाडा विरोधात संयुक्त राष्ट्रात अपील दाखल केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी दावा केला आहे की त्यांची 26 वर्षांची मुलगी वसुंधरा ओसवालला (Vasundhara Oswal) गेल्या 17 दिवसांपासून युगांडामध्ये बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आहे. तिथे वाईट वागणूक दिली जात आहे. पंकज यांनी युनायटेड नेशन्स वर्किंग ग्रुपसमोर अपील दाखल करून म्हटले आहे की, ते वसुंधराशी संपर्क साधू शकत नाही. किंवा तिला कायदेशीर मदतही मिळत नाही. आतापर्यंत भारत सरकार किंवा यूएनच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या प्रकरणावर भाष्य केलेले नाही. पंकज ओसवाल यांची मुलगी पीआरओ इंडस्ट्रीजची कार्यकारी संचालक आहे आणि कंपनीचे कामकाज हाताळते. त्याचा युगांडामध्येही व्यवसाय आहे.


ओसवाल यांच्या प्लांटमधूनच अटक केली


वृत्तानुसार, वसुंधरा यांना युगांडातील ओसवालच्या प्लांटमधून सुमारे 20 सशस्त्र लोकांनी पकडले होते. अटक करण्यापूर्वी आपली ओळख किंवा वॉरंट दाखवले नाही. पंकज यांनी दावा केला की कॉर्पोरेट आणि राजकीय हेराफेरीमुळे त्यांच्या मुलीला अटक करण्यात आली. कोणताही पुरावा नसल्यामुळे बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आहे. पंकज यांच्या म्हणण्यानुसार, एका माजी कर्मचाऱ्याने ओसवालच्या कुटुंबाकडे जामीनदार म्हणून दोन लाख डाॅलर कर्ज घेतले होते. ओसवाल कुटुंबीयांनी हमी घेण्यास नकार दिल्याने त्यांनी वसुंधरा यांच्यावर खोटे आरोप केले. तो माणूस नंतर युगांडामध्ये पळून गेला.


पंकज ओसवाल यापूर्वीही वादात 


पंकज ओसवाल आणि त्यांची पत्नी राधिका याआधीही वादात सापडले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये, त्याच्यावर 100 दशलक्ष डाॅलरची करचोरी आणि कर्ज फसवणुकीचे गंभीर आरोप होते. यानंतर दोघेही डिसेंबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलिया सोडून गेले. पंकज ओसवाल यांनी ऑस्ट्रेलियात ताजमहालसारखा महाल बांधायला सुरुवात केली. सुमारे 70 दशलक्ष डाॅलर (सुमारे 588 कोटी रुपये) किंमत असलेल्या या बंगल्याला 'ताजमहाल ऑन द स्वान' असे नाव देण्यात आले. कर न भरल्याने आणि इमारत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 2010 मध्ये त्याचे बांधकाम थांबवण्यात आले आणि 2016 मध्ये ते पाडण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी त्यांनी सुमारे 22 दशलक्ष डॉलर्स (185 कोटी) खर्च केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या