India Maldives Conflict : भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर (Narendra Modi Lakshadweep Visit) मालदीवच्या मंत्र्यांनी अवमानजनक टिप्पणी केली होती. त्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील वादाला सुरुवात झाली. सोशल मीडियावर BoycottMaldives ट्रेंड सुरू झाला आणि त्याचवेळी हजारो भारतीयांनी मालदीमध्ये केलेलं बुकिंग कॅन्सल केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अवमानजनक टिप्पणी करणं महागात पडलं, त्यानंतर मालदीव असोशिएशन ऑफ टूरिज्म इंडस्ट्री अर्थात MATI यांच्याकडून सावरासावर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.  MATI यांच्याकडून मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याची निंदा व्यक्त केली आहे. MATI म्हटले की, मालदीवच्या इतिहासात भारत कठीण प्रसंगात नेहमीच पुढे राहिलाय. 


MATI अधिकृत आपली भूमिका स्पष्ट केलेय. त्यांनी म्हटलेय की,  'पंतप्रधान नरेंद्र आणि भारतीयांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा आम्ही कठोर शब्दात निषेध करतो. भारत हा आपला सर्वात जवळचा शेजारी आणि मित्र देश आहे. भारत नेहमीच संकटाच्या काळात उभा राहिलाय. सरकार तसेच भारतातील लोकांमध्‍ये आम्‍ही जे घनिष्ट संबंध प्रस्थापित केलाय, त्याबद्दल  कृतज्ञ आहोत.' एएनआयनं याबाबतची पोस्ट केली आहे. 







COVID-19 काळात भारताने नेहमीच मदत केली - MATI


मालदीव असोशिएशन ऑफ टूरिज्म इंडस्ट्री अर्थात MATI ने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले की, "भारत मालदीवच्या पर्यटन उद्योगात सातत्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. कोरोना महामारी (COVID-19) दरम्यान भारत एक मदतनीस म्हणून पुढे आला. भारताने बिघडत चाललेली परिस्थिती सुधारण्यात मदत केली. मालदीवच्या अर्थकरणात भारताचाही मोलाचा वाटा राहिलाय. येणाऱ्या पिढ्यांपर्यंत दोन्ही देशातील संबंध घनिष्ठ राहावेत, अशी आमची इच्छा आहे. अवमानकारक वक्तव्यापासून दूर राहायला हवे, जेणेकरुन दोन्ही देशातील संबंधांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. " 


EaseMyTrip च्या अॅक्शनचा परिणाम - 


EaseMyTrip या ट्रव्हल प्लेटमॉर्मने राजकीय वादानंतर मालदीवचे बुकिंग रद्द केले होते. त्यानंतर MATI ने मवाळ भूमिका घेतली.  EaseMyTrip चे सह-संस्थापक प्रशांत पिट्टी यांनी एक्सवर (आधी ट्विटर) म्हटले होते की, आमची कंपनी भारतीय आहे. आम्ही मालदीवचं कोणतेही बुकिंग न घेण्याचा निर्णय घेतलाय.  


आणखी वाचा :


Maldives : मोदींवर अवमानजनक वक्तव्य करणं पडलं महागात, मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरून हटवलं