ाIndia - Maldives : भारत (India) आणि मालदीवमध्ये राजनैतिक वाद सुरूच आहे. दरम्यान, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद (Mohammad Nashid) यांनी भारताने मालदीववर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचा परिणाम मालदीव मधील देशातील पर्यटन क्षेत्रावर झाल्याचं त्यांनी म्हटलंय. मालदीवच्या जनतेच्या वतीने त्यांनी माफीही मागितली. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी बहिष्काराबद्दल चिंता व्यक्त केली असून त्यामुळे देशाच्या पर्यटनावर परिणाम झाल्याचे म्हटलंय. मोहम्मद नशीद यांनी मालदीवच्या लोकांच्या वतीने भारतीयांची माफीही मागितली आणि भारतीय पर्यटकांनी आपल्या देशात येत राहावे अशी माझी इच्छा आहे. असं ते म्हणाले. नाशीद सध्या भारतात आहेत. दोन्ही देशांमधील तणावाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि मालदीवच्या लोकांसाठी खेद व्यक्त केला.


'मालदीववर बहिष्काराचा खूप मोठा परिणाम'


प्रसारमाध्यमांशी बोलताना नाशीद म्हणाले, "मालदीववर बहिष्काराचा खूप मोठा परिणाम झाला आहे, आणि मला त्याबद्दल खरोखरच काळजी वाटते. मला आणि मालदीवच्या लोकांना याबाबत खेद वाटतो. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी सांगितले की,"मी माझ्या सुट्टीच्या दिवशी मालदीवमध्ये येईन आणि आमच्या पाहुणचारात कोणताही बदल होणार नाही." माजी राष्ट्रपतींनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि ते म्हणाले, "मी काल रात्री पंतप्रधानांची भेट घेतली. मोदींनी आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा समर्थक आहे आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतो."


 


मालदीव आणि चीनमधील करारावर ते म्हणाले...


नाशीद यांनी भारत आणि मालदीव यांच्यातील चिरस्थायी मैत्री देखील अधोरेखित केली, मालदीव आणि चीनमध्ये नुकत्याच झालेल्या संरक्षण करारावर नाशीद म्हणाले की, हा संरक्षण करार आहे असे मला वाटत नाही. मला वाटते की मोइझ्झूला काही उपकरणे खरेदी करायची होती, अधिक अश्रूधुराची आणि अधिक रबर बुलेटची गरज आहे, असा विचार सरकारने केला हे अत्यंत दुर्दैवी आहे. "सरकार बंदुकांनी चालत नाही."