इजिप्त : सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी इजिप्तला रस्त्याने जोडण्यासाठी लाल समुद्रावर पूल बांधण्याची घोषणा केली आहे. पाच दिवसीय इजिप्त दौऱ्यावर असलेल्या सलमान यांनी शुक्रवारी काहिरामध्ये याबाबत माहिती दिली. सौदी अरेबिया आणि इजिप्तमधील व्यापार वाढवण्यासाठी लाल समुद्रावरील प्रस्तावित पूल महत्त्वाचा ठरेल.
2013 मधील इजिप्तक्रांतीनंतर अब्दुल फतेह अली सीसी यांनी इजिप्तची धुरा हाती घेतली होती. त्यानंतर सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांनी इजिप्तला अब्जावधी रुपयांची मदत केली आहे. सौदी अरेबिया सुन्नी देशांचं एक ब्लॉक बनवण्याच्या विचारात आहे, जेणेकरुन या क्षेत्रात शिया इराणींचे वाढता प्रभाव रोखता येईल.
सौदी अरेबियाचे राजे सलमान यांचा इजिप्त दौरा अशा काळात सुरु आहे, जेव्हा दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये प्रचंड तणाव सुरु आहे.
सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांच्याप्रती अल सीसीची भूमिका नरमाईची आहे आणि रियाद यमन यांच्या विरोधात लढण्यासाठी इजिप्तला अधिकाधिक मदतीची गरज आहे.
राजे सलमान यांनी सांगितले, “दोन्ही देशांना जोडण्यासाठी एक पूल तयार करावा, या गोष्टीवर दोन्ही देश तयार आहोत. आशिया आणि आफ्रिका यो दोन खंडांना जोडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल असून दोन्ही खंडांमधील व्यापारवाढीसाठीही महत्त्वाचे ठरणार आहे.”
अल सीसी यांनी सांगितले की, “पूल बांधण्याचा निर्णय अरब एकतेच्या इतिहासातील नवा अध्याय असेल.”
लाल समुद्रावर पूल बांधण्याचा प्रस्ताव याआधीही अनेकदा समोर आला होता. मात्र, त्यावर पुढे काही होऊ शकलं नाही. पूल बांधण्यासाठी जवळपास तीन ते चार अब्ज डॉलर खर्च अपेक्षित असून आताच्या प्रस्तावाबाबत आणखी सखोल माहिती मिळू शकलेली नाही.