Elon Musk Tweet : ट्विटर (Twitter) कंपनी खरेदी केल्यापासून जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) चांगलेच चर्चेत आहेत. सध्या त्यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये मस्क यांनी संशयास्पदरित्या मृत्यूबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटवर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अलिकडेच एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर ते आणखीनच प्रसिद्धीझोतात आले आहेत.


एलॉन मस्क यांनी या चर्चित ट्विटमध्ये लिहीलं आहे की, 'जर माझा संशयितरित्या मृत्यू झाला तर चांगलं होईल.' मस्क याचं हे ट्विट अगदी काही वेळातच प्रचंड व्हायरल झालं आहे. नेटकरी मस्क यांच्या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मस्क यांच्या ट्विटनंतर त्यांच्या जीवाला धोका तर नाही ना, अशा चर्चा रंगल्या आहेत. अनेक युजर्सने या ट्विटला रिट्विट करत वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.






 


मस्क यांच्या ट्विटचा अर्थ काय?
एलॉन मस्क यांचे हे ट्विट खुपच चर्चेत आहे. या ट्विटनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मस्क यांच्या ट्विटनंतर नेटकरी चांगलेच गोंधळात सापडले आहेत. मस्क यांच्या ट्विटचा अर्थ कुणालाही कळलेला नाही. मात्र, मस्क यांच्या ट्विटमध्ये Nice Knowin Ya या गाण्याचा उल्लेख असल्याचं अंदाज व्यक्त केला जातं आहे. मस्क यांनी उल्लेख केलेलं गाणं TWENTY2 या बँडचं आहे.


ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल
एलॉन मस्कने अलिकडेच ट्विटर खरेदी केल्यानंतर स्पष्ट केलं आहे की, भविष्यात ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावं लागेल. एलॉन मस्क यांनी ट्विट करून यासंबंधित माहिती दिली. एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ट्विटर नेहमीच कॅज्युअल युजर्ससाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते."


महत्त्वाच्या इतर बातम्या