Hindu Temple Attacked in Pakistan : पाकिस्तान (Pakistan) मध्ये हिंदू आणि मंदिरांना लक्ष केलं जात आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ला करण्या आला असून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. पाकिस्तानी सीमा हैदरने (Seema Haider) भारतात आश्रय घेतल्यामुळे पाकिस्तानमध्ये हिंदू आणि हिंदू धर्मीयांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रातामध्ये एका टोळीनं हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. सीमा हैदरच्या प्रेमकहाणी विरोधात आक्रमक होत  पाकिस्तानातील डाकूंनी काही दिवसांपूर्वी हिंदू प्रार्थनास्थळांवर आणि हिंदू समुदायावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.


सीमा हैदरचा राग पाकिस्तानातील हिंदूवर


पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतात 16 जुलै रोजी दरोडेखोरांच्या टोळीने एका हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. एका पोलीस अधिकाऱ्याने यासंबंधित माहिती दिली आहे. हल्लेखोरांनी सिंध प्रांतातील कश्मोर भागात स्थानिक हिंदू समुदायाने बांधलेल्या एका लहान मंदिरावर आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सदस्यांच्या जवळपासच्या घरांवर हल्ला केला. याभागात गोळीबारही करण्यात आल्याची माहिती आहे.


मंदिरांवर रॉकेट लाँचरने हल्ला


पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कंधकोट येथील मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी सीमा हैदर भारतात आल्यामुळे आणि हिंदू धर्म स्वीकारत हिंदू तरुणासोबत लग्न केल्यामुळे हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. पबजी गेममुळे सचिनसोबत ओळख झालेली सीमा हैदर सीमापार करत थेट भारतात आली. त्यानंतर, तिने सचिन सोबत लग्नगाठ बांधली. आता तिची भारतातच राहण्याची इच्छा आहे.


48 तासांत हिंदू मंदिराच्या तोडफोडीची दुसरी घटना


पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कश्मोर येथे रविवारी सकाळी एका हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी मंदिर आणि परिसरातील हिंदू समाजाच्या घरांवरही अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले. गेल्या 48 तासांत पाकिस्तानमधील हिंदू मंदिरात तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी शुक्रवारी रात्री कराचीमध्ये 150 वर्षे जुने हिंदू मंदिर पाडण्यात आलं होतं. तर, मारी माता मंदिरावर बुलडोझर चालवण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितलं.


सीमा हैदरला न्यायालयाकडून जामीन


सीमा हैदर 30 वर्षांची आणि सचिन मीना 22 वर्षांचा आहे. या दोघांना ग्रेटर नोएडा पोलिसांनी 4 जुलै रोजी अटक केली होती, पण न्यायालयाने 7 जुलै रोजी दोघांना जामीन मंजूर केला. पाकिस्तानी सीमा हैदर मे महिन्यात नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Seema Haider : मोठी बातमी! मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची धमकी, 'सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर...'