Minorities in Pakistan: पाकिस्तानात हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक गट असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानमध्ये 22,10,566 हिंदू राहतात, जे 18,68,90,601 च्या एकूण नोंदणीकृत लोकसंख्येच्या केवळ 1.8 टक्के आहे. सेंटर फॉर पीस अँड जस्टिस पाकिस्तानच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय डेटाबेस आणि नोंदणी प्राधिकरणाच्या (NADRA) आकडेवारीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अहवालात म्हटले आहे की, अल्पसंख्याकांची संख्या देशाच्या लोकसंख्येच्या पाच टक्क्यांहून कमी असून त्यापैकी हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक गट आहे.


एकूण नोंदणीकृत लोकसंख्या 18,68,90,601
 
NADRA च्या मते, मार्चपर्यंत पाकिस्तानमधील एकूण नोंदणीकृत लोकसंख्या 18,68,90,601 असून त्यापैकी मुस्लिमांची संख्या 18,25,92,000 आहे. प्राधिकरणाकडून अल्पसंख्याकांना मिळालेल्या संगणकीकृत राष्ट्रीय ओळखपत्रांच्या (सीएनआयसी) आधारावर, अहवालात 17 विविध धार्मिक गटांची पुष्टी करण्यात आली आहे. ज्यात 1,400 लोकांनी स्वतःला नास्तिक असल्याचं सांगितलं आहे. पाकिस्तानमध्ये तीन राष्ट्रीय जनगणनेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, देशात 22,10,566 हिंदू, 18,73,348 ख्रिश्चन, 1,88,340 अहमदी, 74,130 शीख, 14,537 बहाई आणि 3,917 पारशी लोक राहतात.


इतर अल्पसंख्याक समुदाय


पाकिस्तानात इतर 11 अल्पसंख्याक समुदाय आहेत. ज्यांची लोकसंख्या दोन हजारांपेक्षा कमी आहे. अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये 1,787 बौद्ध, 1,151 चीनी, 628 शिंटो, 628 ज्यू, 1,418 आफ्रिकन, 1,522 केलेशा अनुयायी आणि सहा लोक जैन धर्माचे अनुयायी आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांना सतत छळाचा सामना करावा लागतो. यात दोन टक्क्यांहून कमी हिंदू आहेत. त्यापैकी 95 टक्के सिंध प्रांतात राहतात. पाकिस्तानमधील हिंदू लोकसंख्येसह अल्पसंख्याक गरीब आहेत आणि देशाच्या विधिमंडळात त्यांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Aamir Liaquat Death : पाकिस्तानी खासदार अमीर लियाकत यांचे निधन, बंद खोलीत आढळला मृतदेह
भारताच्या दोन ऑइल कंपन्यांशी करार करण्यास रशियाचा नकार, अतिरिक्त तेल साठा नसल्याचं दिलं कारण
पर्यावरण निर्देशांकात भारताचा नंबर तळाशी, तब्बल 180 देश पुढे; आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी