Diwali 2023 : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी हा हिंदू धर्मातील (Hindu) सर्वात महत्त्वाचा सण (Festival) मानला जातो. दिवाळी उत्सवाला प्रकाशोत्सव असेही म्हणतात. हा सण फक्त भारतातच नव्हे, तर जगातील इतर देशांमध्येही मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. काही देशांमध्ये दिवाळीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी असते. फिजी, इंडोनेशिया, मलेशिया यासारखे आणखी ही देश आहेत, जिथे दिव्यांचा हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. हे देश कोणते जाणून घ्या.
दिवाळीची लगबग
इंडोनेशियामध्ये दिवाळी ही मोठी गोष्ट आहे. दिवाळीदरम्यान इंडोनेशियामध्ये केल्या जाणार्या जवळपास सर्व विधी भारतातील विधींप्रमाणेच आहेत. इंडोनेशियामध्ये दिवाळी ही राष्ट्रीय सुट्टी आहे. मॉरिशसमधील हिंदू समुदाय मॉरिशसच्या लोकसंख्येच्या सुमारे 50 टक्के आहे. त्यामुळे मॉरिशसमध्येही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मलेशियामध्ये, दिवाळीला 'हरी दिवाळी' म्हणून ओळखलं जातं. येथील प्रथा भारतात पाळल्या जाणार्या प्रथांपेक्षा काहीश्या वेगळ्या आहेत. या दिवशी लोक सकाळी तेल लावून स्नान करतात आणि नंतर मंदिरात जाऊन पूजा करतात. मात्र, मलेशियामध्ये दिवाळीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आहे.
जगातील 'या' देशांमध्येही थाटामाटात साजरी होते दिवाळी
फिजीमध्ये मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. त्यामुळेच येथे दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. फिजीमध्येही दिवाळी ही राष्ट्रीय सुट्टी आहे. या काळात लोक आपल्या नातेवाईकांना तसेच मित्रांना भेटायला जातात आणि त्यांना शुभेच्छा देतात. भारताशेजारील श्रीलंका देशात देखील दिवाळी मोठ्या उत्साहाने केली जाते. हा देशातील सर्वात आवडत्या सणांपैकी एक आहे. श्रीलंकेतही दिवाळी सणाला विशेष महत्त्व असल्याने हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो.
नेपाळ, सिंगापूरमध्येही दिवाळीचा उत्साह
नेपाळमध्येही दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये दिवाळीला तिहार असेही म्हणतात. नेपाळ हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. लोक घरे दिव्यांनी सजवतात आणि लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळी हा नेपाळचा दुसरा सर्वात मोठा सण आहे. सिंगापूरमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी येथील वातावरण अगदी भारतासारखे असते. कॅनडामध्येही दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण, या दिवशी येथे राष्ट्रीय सुट्टी नसते. येथे मोठ्या संख्येने भारतीय लोकसंख्या असल्यालोक कॅनडामध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
युनायटेड किंगडममधील अनेक शहरांमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लीसेस्टर आणि बर्मिंगहॅमचा या शहरांमध्येही दिवाळीची धूम पाहायला मिळते, कारण येथे हिंदूंची संख्या मोठी आहे. थायलंडमध्ये दिवाळी 'लाम क्रिओंग' म्हणून साजरी केली जाते. हा सण जवळजवळ दिवाळीसारखाच आहे. थाई दिनदर्शिकेनुसार हा सण वर्षाच्या बाराव्या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.