दमास्कस : सिरीयात सुरु असलेल्या गृहयुद्धाची दाहकता किती मोठी आहे हे कदाचित शेकडो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला समजणार नाही. मात्र या हल्ल्यात आपला भाऊ गमावलेल्या दोन सिरीयन मुलांची हृदय पिळवटून टाकणारी दृष्यं नुकतीच समोर आली आहेत.

 
अलेप्पो शहरात हवाई हल्ल्यानंतर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं, यात तब्बल 47 हजार सिरीयन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्यात दोन सिरीयन मुलांनी त्यांचा भाऊ गमावला. ही बातमी एकमेकांना सांगताना त्यांचा आक्रोश पाहणाऱ्यांचं हृदय पिळवटून टाकतं.

 
व्हिडिओत दिसणाऱ्या एका भावाचा चेहरा हा पूर्णपणे धुळीने माखून गेला आहे. भाऊ भेटताच हा मुलगा अक्षरशः धाय मोकलून रडला. त्याच्या काही क्षणानंतर आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचं समजताच त्याचा रडण्याचा आवाज हा कोणत्याही संवेदशील मनाला हेलावणारा आहे.

 
या दोन्ही भावांची नावं, त्यांच्या आई-वडिलांचा नेमका ठावठिकाणा समजलेला नाही. हा व्हिडिओ कधी चित्रीत झाला आहे, त्याचीही नोंद आढळत नाही. अध्यक्ष बशर अल-असद आणि इस्लामीक बंडखोरांमध्ये सध्या सिरीयात संघर्ष सुरु आहे. पण ज्या मुलांना युद्ध या शब्दाचा अर्थही कळत नाही, त्यांनाच नेमका याचा परिणाम भोगवा लागत आहे.

 

 

पाहा व्हिडिओ :