लाहोर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची संघटना जमात-उद-दावा पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. जमात-उद-दावा मिल्ली मुस्लीम लीग या नावाने पक्षाची स्थापना करणार आहे.
लाहोरमध्ये रविवारी एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत जमात-उद-दावाचा उमेदवार शेख याकूबने तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. या जागेवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसुम नवाज यांनी विजय मिळवला.
नवी संघटना पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व जागांवर लढणार असल्याचं शेख याकूबने सांगितलं. याकूब मिल्ली मुस्लीम लीग या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार होता. मात्र या पक्षाची अद्याप नोंदणीच नसल्यामुळे निवडणूक लढवता आली नाही.
'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार अमेरिकेच्या आर्थिक विभागाने बंदी घातलेल्या 2012 च्या यादीत याकूबच्याही नावाचा समावेश होता.
पाकिस्तान : हाफिज सईदची संघटना 2018 ची निवडणूक लढवणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2017 10:00 PM (IST)
लाहोरमध्ये रविवारी एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत जमात-उद-दावाचा उमेदवार शेख याकूबने तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. या निवडणुकीनंतर जमात-उद-दावाने सार्वत्रिक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -