किम म्हणाले की, “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)चा भारतीय अर्थव्यवस्थेवर लवकरच सकारात्मक बदल दिसून येईल. जीएसटीसाठी प्राथमिक तयारींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर पहिल्या तिमाहित घसरला. पण आगामी काळात जीएसटीचा सकारात्मक बदल दिसून येईल.”
किम पुढे म्हणाले की, “सध्याची घसरण ही तात्पुरती असून, येत्या काही महिन्यात चांगले बदल दिसतील, आणि भारताच्या जीडीपीमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायाला मिळेल. पंतप्रधान मोदी औद्योगिक क्षेत्रात सुधारणा आणण्यासाठी वास्तवदर्शी काम करत असल्याने, त्यांच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम नक्कीच दिसतील.”
दरम्यान, किम यांनी पंतप्रधानांचे कौतुक केलं. पंतप्रधान मोदी सुधारणांसाठी प्रतिबद्ध आहेत. ते भारताची अवस्था सुधारण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. सध्या भारतासमोर अनेक आव्हानं आहेत. आणि इतर देशांप्रमाणेच त्यामध्ये सुधारणांची शक्यताही सर्वाधिक आहे.
जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर पहिल्या तिमहित भारताच्या आर्थिक विकासात घसरण पाहायला मिळाली. एप्रिल ते जून या तिमाहित भारताचा जीडीपी 5.7 टक्के होता. तर जानेवारी ते मार्चदरम्यान हा दर 6.1 टक्के होता. यामुळे विरोधी पक्षांसह अनेक अर्थतज्ज्ञांनीही जीडीपी घसरण्यासाठी नोटाबंदी आणि जीएसटी जबाबदार असल्याचं म्हटलं.
संबंधित बातम्या
आरबीआयकडून रेपो दरात कोणताही बदल नाही!
यशवंत सिन्हांना 80 व्या वर्षीही पदाची लालसा, नाव न घेता अरुण जेटलींचा टोला
नोटाबंदीनंतर लगेचच जीसएटी का? यशवंत सिन्हांचे हल्ले सुरुच