मुंबई : जगभरात दारुचे (Liquor) असंख्य शौकिन आहे. वेगवेगळ्या देशांमध्या दारुसाठी (Alcohol) वेगवेगळे नियमही आहेत. काही देशांमध्ये दारु बंदी आहे, तर भारतासारख्या देशात दारू विक्रीसाठी सरकारकडून परवाना घ्यावा लागतो. यासोबतच भारत सरकार आणि राज्य सरकार दारूवर कर लादून दरवर्षी कोट्यवधींची कमाई करतात. पण एका देशातील सरकारचं व्यावसायिकांकडून दारु विकत घेत असल्याचं तुम्ही ऐकलंय का? या देशातील सरकार आधी तेथील व्यावसायिकांकडून दारू विकत घेतंय आणि नंतर नष्ट करतंय. फ्रान्समध्ये असंच घडत आहे. फ्रान्स सरकारने आधी दारू व्यापाऱ्यांकडून दारू विकत घेतली आणि नंतर नष्ट केली. पण फ्रान्स सरकार असं का करत आहे हे जाणून घ्या.
सरकारच दारु खरेदी करुन वाया घालवतंय
फ्रान्स सरकार मद्य व्यावसायिकांकून दारु विकत घेऊन मग ती नष्ट करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, यामागचं नेमकं कारण काय? नागरिकांना दारु उपलब्ध होऊ नेय, म्हणून सरकार असं करतंय, असा विचारही काही जणांच्या मनात आला असेल. पण, या मागचं कारण काही वेगळंच आहे. फ्रान्स सरकारचं म्हणणे आहे की, मद्य व्यावसायिकांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. फ्रान्समध्ये आता मद्यपान करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, दारुचा खपही कमी झाला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या वाईन व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही व्यापारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले आहेत.
मद्य व्यावसायिकाांसाठी फ्रेंच सरकारचं पाऊल
फ्रान्समध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या मद्य व्यावसायिकांसमोर सध्या दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे त्यांनी आपली कंपनी बंद करावी आणि दुसरा मार्ग म्हणजे त्याची वाईन जगभरात स्वस्त दरात निर्यात करावी. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वाईनच्या किमती कमी झाल्यास याचा फटका व्यवसायिकांसोबतच फ्रेंच सरकारलाही होईल. त्यामुळे या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी सरकारने वेगळा मार्ग काढला आहे. यामुळेच फ्रान्स सरकार आपल्या व्यापाऱ्यांकडून वाजवी दरात दारू विकत घेऊन नंतर ती नष्ट करण्याचं ठरवलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रान्स सरकारने यासाठी 20 अब्ज युरो निधी बाजूला काढला आहे.
सरकार उधळपट्टी का करतंय?
दरम्यान, मद्य व्यावसायिकांसाठी सरकार उधळपट्टी का करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विकत घेतलेली दारु नष्ट करण्याऐवजी त्याचा दुसरा काही उपयोग करता येईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यावर फ्रान्स सरकारने म्हटलं आहे की, फ्रेंच दारुच्या किमती कमी व्हाव्यात, अशी सरकारची इच्छा नाही, कारण त्यामुळे सरकारी तिजोरीवरही परिणाम होईल. यासोबतच सरकार दारू वाया घालवत नाही. तर, त्यातून दारू वेगळी करून शुद्ध अल्कोहोल इतर कंपन्यांना पुरवत आहे. या शुद्ध अल्कोहोलपासून सॅनिटायझर आणि इतर वस्तू बनवल्या जात आहेत, ज्याला बाजारात चांगली किंमत मिळू शकते. फ्रेंच सरकारने सांगितलं आहे की, काही काळानंतर जेव्हा बाजारातील परिस्थिती सामान्य झाली आणि मागणी वाढली की ही प्रक्रिया थांबवली जाईल.
संबंधित इतर बातम्या :