Global Wind Day 2023 : आज जागतिक पवन दिन. पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिन (Global Wind Day 2023) साजरा केला जातो. पवन दिन पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिन असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.


जागतिक पवन दिन पवन ऊर्जेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील विविध कार्यक्रमांद्वारे नैसर्गिक ऊर्जेच्या या स्वरूपाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. 


जागतिक पवन दिनाचा इतिहास


जागतिक पवन दिन दरवर्षी 15 जून रोजी साजरा केला जातो. याला जागतिक पवन ऊर्जा दिन असेही म्हणतात. युरोपियन विंड एनर्जी असोसिएशनने 2007 मध्ये प्रथमच हा सण साजरा केला, नंतर तो जागतिक पवन ऊर्जा परिषदेच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला. या दिवशी जगभरातील लोकांना पवन ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्याचा निर्णय दोन्ही संस्थांकडून घेण्यात आला. 


युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन (EWEA) ने 2007 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. नंतर, ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल (GWEC) च्या मदतीने हा दिवस विविध कार्यक्रमांच्या आधारे जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला. त्यानंतर, 2009 मध्ये, जागतिक स्तरावर साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवशी लोकांना स्वच्छ हवेचे महत्त्व सांगितले जाईल, असे दोन्ही संस्थांनी ठरवले. या दिवशी वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकांना जागरूक केले जाते. पवन दिनाशी संबंधित कार्यक्रम 75 हून अधिक देशांमध्ये आयोजित केले जात आहेत.


या दिवशी जगभरात पवन ऊर्जेचा दैनंदिन जीवनात वापर करणे, वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि पवन ऊर्जा उत्पादन क्षेत्रात रोजगाराला चालना देणे यासंबंधी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी लोकांना पवन ऊर्जेचा वापर आणि त्यातून मिळणारे फायदे देखील कळतात.  


जागतिक पवन दिवस थीम


या वर्षीच्या जागतिक पवन दिन 2023 ची थीम The Wind In Mind आहे. याचा अर्थ पवन ऊर्जा आणि त्याचे फायदे याबद्दल लोकांना जागरुक करणे आणि त्यातून होणाऱ्या फायद्यांचे कौतुक करणे असा आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Important Days in June 2023 : 'वटपौर्णिमा', 'आषाढी एकादशी'सह विविध सणांची मांदियाळी, जून महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी