मुंबई : सोशल मीडियावर नियमांची एक यादी सध्या खुप व्हायरल होत आहे. एका मुलीने आपल्या बॉयफ्रेन्डसाठी ही यादी तयार केली आहे. यामध्ये मुलीने आपल्या बॉयफ्रेन्डसाठी 22 नियम तयार केले आहेत. एका कारमध्ये ही लिस्ट सापडली आहे. काही दिवसांपूर्वीच ही कार विकली असल्याने ही यादी समोर आली.

कार ज्या व्यक्तीने विकत घेतली त्या व्यक्तीने ही नियमांची यादी सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर या यादीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

काय आहेत गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी तयार केलेले नियम?

  • तू कोणत्याही सिंगल मुलीला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटरवर फॉलो करणार नाहीस.
  • तुझ्याकडे कोणत्याही सिंगल तरुणीचा फोन नंबर असु नये.
  • माझं मन होईल तेव्हा मी तुझा फोन चेक करणार.
  • तुला दिवसातून एकदा तरी मला आय लव्ह यू म्हणावं लागेल.
  • मी मेसेज केल्यावर १० मिनिटांच्या आत तुझा रिप्लाय यायला हवा.
  • जर मी तुला म्हणाले उडी मार! तर तू म्हणायचं जी राजकुमारी.
  • तू कीगनसोबत (मैत्रिणीचं नाव) कधीच राहणार नाहीत.
  • आठवड्यातून दोनेपेक्षा जास्त वेळा तू मित्रांसोबत हँगआऊट नाही करणार.
  • तू कोणत्याही सिंगल मुलीकडे पाहणार नाहीस.
  • जर एखादी मुली तुझ्याकडे आली तर तू तिच्यापासून दूर निघून जायचं.
  • मो (मित्र) आपल्यासोबत प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी नको.
  • तू माझ्यावर कोणत्याच गोष्टीवरून रागावणार नाहीस.
  • तू माझ्याशिवाय कधीही ड्रिंक करणार आहे.
  • मी जेव्हा तुझ्यासोबत असेल, तेव्हा तेथे कोणतीही दुसरी मुलगी आली नाही पाहिजे.
  • आपण एकत्र राहू त्यावेळी तुझे मित्र कधी कधीच घरी आले पाहिजेत.
  • तू मला कोणत्या मुलीसोबत दिसलास तर मी तुझा हत्या करणार.
  • आठवड्यातून किमान दोनवेळा आपण डेटवर जायचं.

ही यादी तयार करणाऱ्या मुलीचा आणि या नियमांचं पालन करणाऱ्या बॉयफ्रेन्डचा पत्ता लागला नाही. ही यादी ट्विटरवर शेअऱ करणाऱ्या व्यक्तीने ट्विट डिलीट केलं आहे. पण ही यादी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.