अफगाणिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता हा हल्ला करण्यात आला. आयसीसचा सुळसुळाट असलेल्या भागात अमेरिकेने हल्ला केला. MOAB (Mother Of All Bombs) हा जगातील सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र विरहीत बॉम्ब अमेरिकेने वापरला आहे.
आयसिसच्या 7 हजार दहशतावादी तळांवर अमेरिकेनं जगातील सर्वात मोठा बिगर आण्विक बॉम्ब जीबीयू 43 ने अफगाणिस्तानवर हल्ला केला. तब्बल 11 हजार किलोंचा हा बॉम्ब आहे.
या बॉम्बला ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’ संबोधलं जातं.
ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण पाकिस्तानच्या पेशावरपासून १०० किमी अंतरावर आहे. यामध्ये शेकडो जणांचा जीव गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा बॉम्ब सामान्य लढाऊ विमानाद्वारे टाकला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे मालवाहू एमसी-१३० विमानाने तो टाकला. विशेष म्हणजे भारतातील आयसीसची वाढती पाळंमुळं हा चिंतेचा विषय असताना भारतासाठी हा बॉम्बहल्ला अतिशय महत्वाचा आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे आपण अध्यक्ष झालो तर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवर सर्वात मोठा बॉम्ब टाकू हे डोनाल्ड ट्रम्प यांचं निवडणूक प्रचारातील वाक्य त्यांनी खरं करुन दाखवलं.
काय आहे MOAB ?
MOAB म्हणजे ‘Mother of All Bombs’ हा जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब म्हणून ओळखला जातो. याला GBU-43/B या नावाने ओळखलं जातं. 11 टन वजनाची शस्त्रं वाहण्याची क्षमता MOAB मध्ये असून याचं वजन 9 हजार 797 किलो म्हणजे जवळपास 100 टन इतकं असल्याची माहिती आहे.
गुहा किंवा बंकर यासारखी भूमिगत ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी मुख्यत्वे हा बॉम्ब वापरला जातो.
अमेरिकन वायुदलाने या बॉम्बची पहिली चाचणी 2003 साली केली होती, पण आतापर्यंत याचा वापर कधीच करण्यात आला नव्हता.
अफगाणिस्तानमधील आयसिसची ठिकाणं उद्ध्वस्त करणं अमेरिकेचा उद्देश होता. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे अनेक जवान गेल्या काही दिवसात मारले गेले होते. त्यानंतर अमेरिकेने हे कठोर पाऊल उचललं आहे.
GBU-43/B ची वैशिष्ट्ये
- हा बॉम्ब आकाराने आवाढव्य आहे. याची लांबी 30 फूट (9 मीटर), उंची 3 फूट 4 इंच आणि वजन 9 हजार 800 किलो आहे.
- या बॉम्बमध्ये जीपीएस प्रणालीचा वापर
- GBU-43 ची मारक क्षमता 11 टन TNT इतकी आहे. भुयार किंवा बंकर उडवण्यासाठी अशा शक्तीशाली बॉम्बचा वापर करतात.
- हा बॉम्ब MC-130 वाहतूक विमानाने फेकण्यात आला. जमिनीवर टाकता या बॉम्बचा विध्वंसक स्फोट होतो.
- हा बॉम्ब फेकताना त्याला पॅराशूटने झटका दिला जातो.
- जमिनीवर कोसळल्यानंतर या बॉम्बची तीव्रता सर्व दिशेला 1 मैलापर्यंत जाणवते.
- या बॉम्बला अॅल्युमिनिअरचं पातळ आवरण असतं. स्फोटाची तीव्रता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
- अमेरिकेने इराक युद्धादरम्यान हा बॉम्ब बनवला होता.
- या बॉम्बसाठी अंदाजे 16 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 103 कोटी इतका खर्च आहे.
- या बॉम्बची 2003 मध्ये पहिली चाचणी झाली होती. यापूर्वी हा कधीही वापरला नव्हता.
फादर ऑफ ऑल बॉम्ब
अमेरिकेकडे जसा 'मदर ऑफ ऑल बॉम्ब्स' अर्थात MOAB आहे, तसाच रशियाकडे फादर ऑफ ऑल बॉम्ब्स (FOAB) आहे.
हा बॉम्बही अत्यंत विध्वंसक आहे. हा बॉम्ब फ्यूल एयर बॉम्ब म्हणूनही ओळखला जातो.