Zelensky Invite PM Modi: जपानमधील हिरोशिमामध्ये सध्या 'G-7' शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देखील सहभागी होण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत. तसेच त्यांनी तिथे क्वाड समुहातील नेत्यांची देखील भेट घेतली. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांची देखील भेट घेतली. त्यानंतर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनला येण्याचे निमंत्रण देखील दिले. 


युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ट्विट देखील केले. त्यात त्यांनी म्हटले की, जपानमध्ये भारताच्या पंतप्रधानांसोबत बैठक झाली, तसेच यावेळी त्यांना युक्रेनला येण्याचे निमंत्रण देखील दिले आहे.  तसेच भारताने युक्रेनला केलेल्या मदतीचे आभार देखील झेलेन्स्की यांनी मानले आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये अजून देखील संघर्ष सुरुच आहे. त्याच पार्श्वभूमीवर युद्धग्रस्त देशाच्या दौऱ्याचे निमंत्रण झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. 






पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऋषी सुनक यांची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये सुरु असलेल्या G-7 बैठकीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची देखील भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांची देखील भेट घेतली. 






पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्याचा दुसरा दिवस


जपानाच्या हिरोशिमा शहरामध्ये जगातील श्रीमंत देशांचं संघटन असलेल्या ‘G7’ देशाची बैठक शुक्रवारी, 19 मे पासून सुरू झाली. या बैठकीत सलग चार वेळा महत्त्वाचे पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. जागतिक स्तरावर भेडसावणाऱ्या समस्येचा सामना करण्यासाठी कालपासून G-7 समूहाची हिरोशिमा येथे बैठक सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PM Modi Japan Visit : जपानमध्ये G-7 देशांच्या तीन दिवसीय परिषदेला सुरुवात, G-7 च्या बैठकीचा मुख्य अजेंडा काय?