Nobel Prize For Chemistry: यंदाच्या रसायनशास्त्राच्या  नोबेल पुरस्काराची (Nobel Prize) घोषणा झाली असून कॅरोलिन आर. बर्टोझी (Carolyn R. Bertozzi), मॉर्टन मेल्डल (Morten Meldal) आणि के. बॅरी शार्पलेस (K. Barry Sharpless) यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. क्लिक केमिस्ट्री आणि बायोऑर्थोगोनल (bioorthogonal) केमिस्ट्रीचा विकास या संबंधित केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.  


वैद्यकीय क्षेत्रातील आणि भौतिकशास्त्र क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील  नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) घोषणा केली जात आहे. आता रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसनेनं केली आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने कॅरोलिन आर. बर्टोझी , मॉर्टन मेल्डल  आणि के. बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. क्लिक केमिस्ट्री आणि बायोऑर्थोगोनल (bioorthogonal) केमिस्ट्रीचा विकास या संबंधित केलेल्या संशोधनासाठी कॅरोलिन. आर. बर्टोझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 


कोण आहेत यंदाचे  रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे विजेते?


कॅरोलिन आर. बर्टोझी या अमेरिकेच्या रसायनशास्त्रज्ञ आहेत ज्या रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या संशोधनासाठी ओळखल्या जातात. तर मॉर्टन मेल्डल हे डेनमार्क कोपनहेगन, डेन्मार्क येथील कोपनहेगन विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. कार्ल बॅरी शार्पलेस हे एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आहेत जे स्टिरिओसेलेक्टीव्ह रिअॅक्शन्स आणि क्लिक केमिस्ट्रीमधील कामासाठी ओळखले जातात.






क्लिक केमिस्ट्री आणि बायोऑर्थोगोनल केमिस्ट्री 


क्लिक केमिस्ट्री ही विशिष्ट बायोमोलेक्यूलला प्रोब किंवा सब्सट्रेट जोडण्याची पद्धत आहे, ज्याला बायोकॉन्ज्युगेशन म्हणतात. तर बायोऑर्थोगोनल केमिस्ट्री हा शब्द मूळ जैवरासायनिक प्रक्रियेत हस्तक्षेप न करता जिवंत प्रणालीच्या आत उद्भवू शकणार्‍या कोणत्याही रासायनिक अभिक्रियाला सूचित करतो.


3 ऑक्टोबरपासून नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली. सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार स्वीडनच्या स्वांते पाबो यांना देण्यात येणार आहे. तर मंगळवारी भौतिक शास्त्राच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर  आणि अँटोन झेलिंगर यांना जाहीर करण्यात आला आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: