फ्लोरिडाच्या फोर्ट मेयर्समध्ये असलेलं नाईट क्लब ब्ल्यूमध्ये हल्लेखोर घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. रात्री एकच्या सुमारास झालेल्या या घटनेत दोघांना जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी नाईट क्लबला घेराव घातला. गेल्याच महिन्यात फ्लोरिडातील एका गे नाईट क्लबमध्ये हल्ला झाला होता. यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला होता.