Mirosław Hermaszewski Death : 1978 मध्ये ज्यांनी सोव्हिएत अवकाशयानाद्वारे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली असे पोलंडचे एकमेव अंतराळवीर जनरल मिरोस्लाव्ह हर्म्सझेव्स्की (Mirosław Hermaszewski) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Mirosław Hermaszewski यांचे जावई आणि युरोपियन संसदेचे सदस्य रेज्जर्ड यांनी सोमवारी ट्विटरवरून संबंधित माहिती दिली. पोलिश मीडिया आउटलेट्सला दिलेल्या माहितीनुसार, हर्म्झेव्स्की यांचा मृत्यू वॉर्सा येथील रुग्णालयात शस्त्रक्रियेत झालेल्या गुंतागुंतीमुळे झाला असे सांगण्यात येत आहे.
जार्नेकी यांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, "कुटुंबाच्या वतीने, मी जनरल मिरोस्लाव्ह हर्म्सझेव्स्की यांच्या मृत्यूबाबत अत्यंत दुःखद बातमी देत आहे," जनरल मिरोस्लाव्ह हर्म्सझेव्स्की "एक उत्तम पायलट, चांगले पती आणि वडील तसेच खूप प्रिय दादा होते," असे त्यांनी ट्विट केले आहे.
अंतराळातील प्रवासामुळे हर्म्सझेव्स्की राष्ट्रीय नायक ठरले होते
हर्म्सझेव्स्की यांना त्यांच्या अंतराळ प्रवासासाठी राष्ट्रीय नायक मानले गेले होते. 1978 च्या जून आणि जुलैमध्ये नऊ दिवस, ते आणि सोव्हिएत अंतराळवीर प्योटर क्लीमुक यांनी सॉयुझ 30 अंतराळयानाने सलीयुट 6 ऑर्बिटल स्पेस स्टेशनवर पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घेतली. त्यांनी तब्बल 126 वेळा पृथ्वीची परिक्रमा केली.
हर्म्झेव्स्की यांना प्रवासादरम्यान जाणवली होती 'ही' भीती
पोलिश वृत्तपत्र Rzeczpospolita सह 2018 च्या मुलाखतीदरम्यान, हर्म्सझेव्स्की यांनी सांगितले की, उड्डाणा दरम्यान त्यांची सर्वात मोठी भीती ही होती की त्यांचे स्पेसशिप उल्काला धडकू नये.
कोण होते Mirosław Hermaszewski ?
मिरोस्लॉ हर्माझेव्स्की हे एक पोलिश अंतराळवीर, पायलट आणि पोलिश हवाई दल अधिकारी होते. 1978 मध्ये सोव्हिएत सोयुझ 30 अंतराळयानातून त्यांनी उड्डाण केले तेव्हा ते पहिले आणि आजपर्यंत अंतराळातील एकमेव पोलिश नागरिक ठरले. अवकाशात पोहोचणारे ते 89 वे व्यक्ती होते. 1976 मध्ये, इंटरकोसमॉस स्पेस प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी 500 पोलिश लष्करी वैमानिकांच्या गटातून त्यांची निवड करण्यात आली. जवळपास दोन वर्षांच्या कालावधीसाठी, त्यांनी जवळच्या स्टार सिटीमधील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये सैद्धांतिक कौशल्य, शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक तणावाचा प्रतिकार (इतर विविध घटकांसह) व्यापक प्रशिक्षण घेतले. जून 1978 च्या उत्तरार्धात, बेलारूसमधील सोव्हिएत अंतराळवीर प्योत्र क्लीमुकसह , हर्माझेव्स्कीने बायकोनूर कॉस्मोड्रोम वरून सॅल्युट 6 अंतराळ स्थानकावर आठ दिवस घालवण्यासाठी उड्डाण केले.
महत्त्वाच्या बातम्या :