New Virus: पृथ्वीवर अस्तित्वात असलेले विषाणू (Virus) हे मानवाच्या जन्मापूर्वीपासून आहेत. पृथ्वीवर असे अनेक विषाणू (Virus) आहेत, ज्यांचा संबंध मानवाशी आला तर त्या व्हायरसला रोखणं अशक्य होईल. खरं तर डायनासोरच्या युगानंतर जेव्हा पृथ्वीवर हिमयुग आलं, तेव्हा अनेक प्राणघातक विषाणू बर्फात गाडले गेले. विशेषतः आर्क्टिकमध्ये.


कोरोना महामारीने (Corona) अवघ्या जगात दहशतीचं वातावरण निर्माण केलं होतं, त्यानंतर आता आणखी एका महामारीची भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, आर्क्टिकमध्ये बर्फात गाडले गेलेले लाखो प्राणघातक व्हायरस आहेत, जे तापमान वाढल्यास तिथला बर्फ वितळला की बर्फाच्या पाण्यासह मानवापर्यंत पोहोचतील. समस्या अशी आहे की मानव अद्याप अशा व्हायरसशी लढण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या तयार नाही. याचा पुरावा कोरोनानेच आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे.


शास्त्रज्ञांचं म्हणणं काय?


शास्त्रज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवी जीवनाला मोठा धोका निर्माण झाला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे आणि हवामानातील बदलामुळे बर्फातील पर्माफ्रॉस्ट झपाट्याने वितळत आहेत. बर्फ वितळल्याने बर्फात गाडले गेलेले अनेक जुने विषाणू (Virus) पुन्हा जिवंत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


शास्त्रज्ञांच्या दाव्यातही तथ्य आहे, कारण  2015 मध्ये यापैकी एक झोम्बी व्हायरस जिवंत झाला होता. हा विषाणूही लाखो वर्षं त्या बर्फात गाडला गेला होता. जे विषाणू लाखो वर्षांपूर्वी बर्फात गाडले गेले होते, ते आता पुन्हा जिवंत होतील की काय? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.


बर्फ वितळल्याने व्हायरस होतील जिवंत


प्राथमिक अहवालानुसार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर गोलार्धाची एक चतुर्थांश गोठलेली जमीन वितळत आहे. यामुळे लाखो वर्षांपासून त्याखालील गोठलेली सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात. माहितीनुसार, त्याखाली अनेक घातक सूक्ष्मजंतू असतात. संशोधकांचं म्हणणं आहे की, वितळणाऱ्या बर्फाच्या या सेंद्रिय पदार्थाच्या भागामध्ये वर्षांपासून गाडले गेलेले व्हायरस मोठ्या प्रमाणात असतात.


नासाही करत आहे संशोधन


गेल्या काही वर्षांत, आर्क्टिक प्रदेशातील पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळे पृथ्वीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी अनेक संशोधनं करण्यात आली आहेत. यातील एक संशोधन नासानेही केलं आहे. जानेवारी 2022 मध्ये, NASA च्या संशोधनात असं दिसून आलं की, पर्माफ्रॉस्टच्या अचानक वितळण्यामुळे कार्बन सोडला जात आहे, ज्यामुळे लाखो वर्षांपासून पर्माफ्रॉस्टमध्ये कैद असलेल्या विषाणूंना (Virus) देखील मुक्त केलं जाईल.


हेही वाचा:


Chandrayaan 3: युरोपियन स्पेस एजन्सीकडून चांद्रयान 3 च्या यशाचं कौतुक; नासा देखील म्हणाली...