नवी दिल्ली: युरोपियन युनियन अँटीट्रस्ट नियामकांनी फेसबुकच्या जाहिरातींबाबत चौकशी सुरू केली आहे. जाहिरातदारांचा डेटा वापरून फेसबुक युरोपियन युनियनचे कोणतेही नियम मोडत नाही ना हे पडताळून पाहण्यासाठी आता सोशल नेटवर्कची तपासणी केली जाणार आहे.
जाहिरातदारांच्या डेटाचा वापर फेसबुकने केल्याचा आरोप प्रतिस्पर्धकांनी केला आहे. Antitrust खात्याकडे याची तक्रार केल्यानंतर यासंदर्भात तपासणीची घोषणा करण्यात आली आहे. याला उत्तर देताना फेसबुकने म्हटले आहे की ते युरोपियन युनियन आणि यूके दोन्ही तपासांना पूर्ण सहकार्य करतील, असं वृत्त रॉयटर्स या संस्थेने दिलं आहे. फेसबुक म्हटले की त्यांचे "मार्केटप्लेस आणि डेटिंग लोकांना अधिक ऑप्शन्स देतात, दोन्ही उत्पादनं बर्याच मोठ्या कंपन्यांसह अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात काम करतात".
गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप कायद्याचे पालन करण्यास तयार; ट्विटर अजूनही अडून
EXPLAINER VIDEO | फेसबुक समोर मोठे संकट, फेसबुक विरोधात अविश्वासाचा खटला #Facebook #Instagram
फेसबुकचे ऑनलाइन मार्केटप्लेस 2016 मध्ये स्पर्धेत आले आणि सध्या ते 70 देशांमधील तब्बल 800 मिलियन युजर्स वापरत आहेत. या मार्केटप्लेसमध्ये वस्तूंची खरेदी व विक्री केली जाते. 2012 मध्ये जेव्हा त्याची तपासणी सुरू झाली तेव्हा युरोपियन कमिशनने ऑनलाइन वर्गीकृत जाहिरातींमधील प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध असलेल्या त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी प्रश्नावली पाठविली. तेव्हा रॉयटर्सने यूरोपियन युनियनच्या दस्तऐवजाचा खुलासा केल्याचे नमूद केले.
Facebook Data Leak : फेसबुकचा डेटा पुन्हा लीक; 60 लाख भारतीयांच्या डेटावर हॅकर्सचा डल्ला