नवी दिल्ली : तुमच्याकडे जर सोशल मीडियासाठी नवीन कन्टेन्ट निर्माण करायची काही कल्पना असेल तर ती तुम्हाला अब्जाधीश बनवू शकते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर  2022 पर्यंत असा नाविण्यपूर्ण कन्टेन्ट तयार करणाऱ्या यूजर्सना एक अब्ज डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात सांगायचं झालं तर जवळपास 74 अब्ज रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग याने बुधवारी ही घोषणा केली. 


फेसबुक आणि इन्स्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडियाकडे नवीन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी फेसबुकची ही योजना आहे. टिकटॉक या लोकप्रिय सोशल मीडियाप्रमाणे फेसबुक आणि इन्स्टाग्राम आता विविध कल्पना अमलात आणणार असल्याचं हे संकेत आहेत. 


मार्क झुकरबर्गने फेसबुकवर एक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. तो आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, "आपण काहीतरी नाविण्यपूर्ण निर्मिती करणाऱ्या कोट्यवधी लोकांना एक सोशल प्लॅटफॉर्म मिळवून देणार आहे. या नवनिर्मितीसाठी आपण एका कार्यक्रमाची आखणी करत असून त्यामध्ये 2022 पर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नाविण्यपूर्ण कन्टेन्ट देणाऱ्यांसाठी बक्षिस म्हणून एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अशा पद्धतीची गुंतवणूक ही काही आमच्यासाठी नवीन नाही, पण येत्या काळात या योजनाची व्याप्ती वाढवण्यासाठी मी उत्सुक आहे."


 



जगभरात लोकप्रिय सोशल माध्यम असलेल्या टिकटॉक सोबत स्पर्धा करण्यासाठी मार्क झुकरबर्गने ही योजना तयार केली असल्याचं स्पष्ट आहे. गेल्या काही वर्षांत टिक टॉकने जगभरात आपली लोकप्रियता वाढवली आहे. त्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर असाच कन्टेन्ट आणण्याची तयारी मार्क झुकरबर्गने केली आहे. यूजर्सना देण्यात येणारे हे बक्षीस फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या बोनस इनिशिएटिव्ह सीरिजच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :