पॅरिस : फ्रान्स सरकारने गूगलला झटका देत 500 मिलियन यूरो अर्थात 4,421 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका पब्लिशर्स सोबत झालेल्या वादामध्ये गूगलने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपण ही कारवाई करत असल्याचं फ्रान्स सरकारने स्पष्ट केलं आहे. तर गूगलने फ्रान्स सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 


काय आहे प्रकरण? 
गूगलने एका पब्लिशर्सच्या बातम्यांच्या वापर आपल्या वेबसाईटवर केला होता. त्यावर संबंधित पब्लिशर्सने कॉपीराईटच्या कायद्यांचे उल्लंघन झाले असल्याची तक्रार करत फ्रान्सच्या कॉम्पिटिशन रेग्युलर कमिशनकडे धाव घेतली होती. फ्रान्सच्या सरकारने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली. या वादात फ्रान्सच्या अॅन्टिट्रस्ट वॉचडॉगने गूगलवर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला. गूगलने न्यूज पब्लिशर्सच्या माहितीचा वापर केला पण त्याचा मोबदला दिला नसल्याने त्याला 4,421 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. 


 






सरकारने ठोठावलेल्या दंडाची रक्कम गूगल कशापद्धतीने संबंधित कंपनीला देणार याची माहिती येत्या दोन महिन्यांच्या आत द्यावी असाही आदेश देण्यात आला आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत गूगलने ही माहिती दिली नाही तर पुढच्या काळासाठी प्रतिदिन जवळपास 10 लाख डॉलर्सची रक्कम दंड म्हणून भरावी लागेल असाही आदेश देण्यात आला आहे. 


फ्रान्सच्या अॅन्टिट्रस्ट वॉचडॉगने ठोठावलेल्या दंडावर गूगलने नाराजी व्यक्त केली आहे. आपण या प्रकरणी काही पब्लिशर्सशी चर्चा करत आहेत पण त्या आधीच आपल्याला दंड ठोठावल्याचं गूगलने स्पष्ट केलंय. 


फ्रान्सच्या अॅन्टिट्रस्ट एजन्सीने या आधी गूगलला तीन महिन्यांच्या आत पब्लिशर्सशी चर्चा करावी असा आदेश गूगलला दिला होता. त्याचे पालन न झाल्याचा ठपका ठेऊन आता गूगलला दंड ठोठावण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या :