Marke Zuckerberg: मेटाने गेल्या तीन वर्षांत सीईओ मार्क झुकरबर्गच्या (Mark Zuckerberg) वैयक्तिक सुरक्षेच्या खर्चात चार कोटी डॉलर्सपेक्षा (जवळपास 330 करोड रुपये) अधिकची वाढ केली आहे. झुकरबर्गचे कुटुंब चालवत असलेल्या फाऊंडेशनने 'पोलिसांना बदनाम' करू इच्छिणाऱ्या गटांना लाखो डॉलर्स दान केले आहेत आणि हे पोलीस विरोधी गट आहेत ज्यांना झुकरबर्गचे कुटुंब आर्थिक सहाय्य पुरवते. द न्यूयॉर्क पोस्टने प्रसिद्ध केलेल्या बातमीत हा दावा करण्यात आला आहे.


कंपनीच्या फेब्रुवारीच्या फाइलिंगमध्ये असं म्हटलं आहे की, सीझेडआयने (CZI) मार्क झुकरबर्गच्या वैयक्तिक सुरक्षेवरील (Personal Security) खर्च 4 कोटी डॉलर्सने वाढवला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या सुरक्षिततेवर 2023 मध्ये 14 कोटी डॉलर्स खर्च केले जात आहेत. तर मागील वर्षी झुकेरबर्गच्या सुरक्षेवर 10 कोटी डॉलर्स खर्च करण्यात आले होते. कंपनीने म्हटलं आहे की मार्क झुकेरबर्गच्या सुरक्षेवरचा खर्च हा त्यांच्या कंपनीतील स्थान आणि इतर गोष्टींमुळे वाढला आहे.


2021 मध्ये 27 कोटी डॉलर्स होतं सुरक्षा पॅकेज 


अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, झुकरबर्गने बोनस पेमेंट (Bonus Payment), इक्विटी गिफ्ट (Equity Gift) आणि इतर कोणत्याही नुकसान भरपाईशिवाय वार्षिक पगारात (Annual Income) केवळ एक डॉलर घेण्याची विनंती केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, मेटाने मार्क झुकरबर्ग, चॅन आणि त्यांच्या मुलींच्या संरक्षणासाठी 2021 मध्ये सुमारे 27 करोड डॉलर्सचं सुरक्षा पॅकेज निश्चित केलं होतं.


कोणत्या पोलीस विरोधी गटाला किती देणगी?


या अहवालात दावा करण्यात आला आहे की, 2020 पासून DefundPolice.org च्या मागे असलेल्या PolicyLink या संस्थेला चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्हकडून 3 कोटी डॉलर्सच्या देणग्या मिळाल्या आहेत. ही संघटना पोलिसविरोधी आहे. याशिवाय, मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांच्या CZI यांनी 'सॉलिडेअर' नावाच्या दुसर्‍या अँटी-कॉप गटाला 2.5 कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे.


झुकरबर्गला किती फायदा?


मेटाच्या सीईओचे (Meta CEO) उत्पन्न गेल्या काही वर्षांत खूप वाढलं आहे. या वर्षी 30 जूनपर्यंत मार्क झुकरबर्गला 58.9 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, मार्क झुकरबर्गचं एकूण उत्पन्न 106 अब्ज डॉलर्स झालं आहे. त्याला फक्त एका दिवसात 562 कोटी डॉलर्सचं नुकसान झालं आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत मार्क झुकेरबर्ग 9व्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा:


Indian Army Agnipath Scheme: अग्निपथ योजनेमुळे तरुणांचा भ्रमनिरास! मधूनच ट्रेनिंग सोडणाऱ्या अग्निवीरांकडून खर्च वसूल करण्याची तयारी