Agnipath Scheme: भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत (Indian Army Agnipath Scheme) लवकरच अग्निवीर  वेगवेगळ्या युनिट्समध्ये सामील होणार आहेत. अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचची ट्रेनिंग संपली असून दुसऱ्या बॅचची ट्रेनिंग सुरू झाली आहे. पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच अनेक तरुण मधूनच ट्रेनिंग सोडून गेले आहेत. विविध कारणं देऊन ट्रेनिंग मधेच सोडणाऱ्या तरुणांवर कारवाई केली जाऊ शकते. तरुणांच्या प्रशिक्षणासाठी खर्च झालेली रक्कमही त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.


पहिल्या बॅचमध्ये 50 हून अधिक जणांनी सोडली ट्रेनिंग


लष्कराच्या ट्रेनिंगमध्ये मधूनच बाहेर पडायचं असल्यास काही नियम नाहीत, पण सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आता नवे नियम बनवण्याच्या तयारीत आहे. नवभारत टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्या तरुणांकडून आता ट्रेनिंग शुल्क आकारण्यात येणार आहेत. रिपोर्टमध्ये एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, पहिल्या बॅचमधून 50 पेक्षा अधिक तरुणांनी ट्रेनिंग मधूनच सोडली आहे, तर दुसऱ्या बॅचमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्यांकडून ट्रेनिंग शुल्क आकारण्याचा विचार आहे, यामुळे जे भारतीय लष्करात भरती होण्यासाठी खरोखरच इच्छुक आहेत, अशाच तरुणांवर लक्ष देता येणार आहे.


विविध कारणं सांगून लष्कराच्या ट्रेनिंगमधून बाहेर


अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितलं की, मधूनच ट्रेनिंग सोडणाऱ्या तरुणांकडून विविध कारणं देण्यात येतात. काही जणांनी 30 दिवस किंवा त्याहून अधिक मेडिकल लिव्ह (Medical Leave) घेतली आणि ट्रेनिंगमधून बाहेर पडले. काहींनी चांगली संधी मिळाल्याचं सांगून ट्रेनिंग मधेच सोडली. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सैन्यात असा नियम आहे की, जर कोणी 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस ट्रेनिंगला गैरहजर राहिला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.


1 जानेवारीला पहिल्या बॅचमध्ये 19 हजारांहून अधिक अग्निवीरांना सामील करुन घेतलं होतं, ज्यांची देशभरातील 40 वेगवेगळ्या सेंटर्सवर ट्रेनिंग झाली होती. सहा महिन्यांच्या ट्रेनिंगमध्ये अग्निवीरांसाठी बेसिक आणि अॅडव्हांस्ड मिलिट्री प्रोग्राम्स करुन घेतले जातात. सहा महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर अग्निवीरांना विविध युनिट्समध्ये तैनात केलं जाणार आहे आणि 4 वर्षांनंतर यातील 25 सैनिकांना परमनंट केलं जाणार आहे. तसं पाहिलं तर भारतीय लष्कर 50 युवकांनी परमनंट करु इच्छिते, त्यासाठी भारतीय लष्कराने केंद्रासमोर प्रस्ताव देखील मांडला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Railway Fare Slashed: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता रेल्वे प्रवास होणार स्वस्त; वंदे भारतसह इतर रेल्वे तिकीटात 25 टक्क्यांपर्यंत कपात