extra marital affairs : लग्नानंतर पती आणि पत्नीचं नातं अतिशय पवित्र मानलं जातं. प्रेम, विश्वास आणि काय एकमेकांना साथ देण्याची कमिटमेंट पेक्षाही हे नातं जास्त मजबूत असलेलं आपल्याला अनेकदा पाहायला मिळाळंय. पती-पत्नीचं नात आयुष्यातील अनेक चढ-उतारांना तोंड देत पुढे जात असतं. मात्र, तरिही काही लोक लग्न करत असताना आपल्या आयुष्यातील सत्य लपवून ठेवत असतात. पुढे जाऊन आयुष्यातील काही गोष्टी लपवणे महागात देखील पडू शकतं. काही लोक अशा अनेक चुका करतानाही पाहायला मिळाली आहेत.
पती-पत्नीशी निगडीत असाच एक हैराण करणारा प्रकार चीनमधून समोर आलय. या प्रकरणात नवऱ्याला त्याच्या बायकोचं सत्य तब्बल संसाराची 16 वर्षे सोबत घालवल्यानंतर समजलं आहे. दरम्यान, 16 वर्षांनंतर हे सत्य समोर आल्यानंतर प्रत्येक जण हैराण झालेलं पाहायला मिळालं आहे. पती-पत्नीच्या आता घटस्फोट झाला असला तरी त्याच्या पायाची सुरुवात 2007 मध्येच झाली होती. चेन झिक्सियान नावाच्या व्यक्तीने यू हुआ नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. ही मुलगी त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान होती. लग्नाच्या काही महिन्यानंतर ती प्रेग्नंट झाली होती. चेन बाप होणार असल्याने इतका खूश होता की, त्याला शंका देखील नव्हती.
कसं समोर आलं पत्नीचं सत्य?
ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणारा चेन जियांग्शी जियांग्शी प्रांतातील डेक्सिंगमध्ये राहायचा. कामाचा लोड असल्याने ती फार कमी वेळेस ते घरी असायचे. दरम्यान, त्यावेळी यू हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. मात्र, ड्रायव्हर पतीला देखील हेच वाटले की, हे माझेच मुलं आहे. मात्र, 2019 मध्ये ट्रक ड्रायव्हरच्या पत्नीने तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचं सांगितल्यानंतर शंकेची पाल चुकचुकली. त्यावेळी चेन याने यू हिला याबाबत विचारणा केली. त्यावेळी पुन्हा एकदा यू हिने सांगितलं की, हे मुलं माझचं आहे. आता तुला तिसरी मुलगी झाली आहे.
चेनला 2020 साली सत्य समोर आल्यानंतर मोठा धक्का बसल होता. त्याला या वर्षी समजलं की, आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत. तेव्हा तो मानसिकरित्या खचून गेला होता. एवढेच नाही, तिने शांगराओ चौथ्या मुलीला जन्म दिला होता. चेन ने गुपचूप जाऊन चाचण्या करून घेतल्या. रिलीज फॉर्ममध्ये त्याचं नाव आणि फेक स्वाक्षरी होती. त्यानंतर हेच मुद्दे घेऊन तो कोर्टात गेला. त्यावेळी न्यायालयाने आदेश दिले की, चेनला त्याच्या दोन मोठ्या मुलींची कस्टडी देण्यात यावी आणि त्याला पत्नीला पोटगी द्यावी लागेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या