Elon Musk Tweet: जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये मोजल्या जाणारा एलॉन मस्क (Elon Musk) कायम त्याच्या हटके ट्वीट्समुळेही (Elon Musk Tweet) चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो नासाच्या (NASA) आगामी मोहिमेबद्दलच्या ट्वीटला केलेल्या रिप्लायमुळे चर्चेत आला आहे. त्याने ट्वीटमधून कोट्यवधी वर्षांपूर्वी अस्त पावलेल्या डायनासोर्सचा बदला घेण्याची मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. आता हे सारं वाचून तुम्ही थोडे संभ्रमात पडला असाल तर नेमकं हे प्रकरण काय आहे आम्ही तुम्हाला फोडून सांगणारच आहोत...


नासा ही एक आगामी अंतराळ मोहिम लवकरच राबवणार आहे. या मोहिमेद्वारे पृथ्वीवर बऱ्याच वर्षांपासून पडणाऱ्या लघुग्रहांना रोखण्यासाठी नासा प्रयत्न करणार आहे. याला डबल अॅस्टरॉईड रेडिकेशन टेस्ट (Double Asteroid Redirection Test) असं नाव देण्यात आलं आहे. या मोहिमेसाठी एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स (SpaceX) मदत करणार असल्याने मस्कही या मोहिमेत एक जबाबदारी पेलणार आहे. दरम्यान त्यामुळेच कि काय त्याने नासाच्या या मोहिमेच्या घोषणेच्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे. यामध्ये मस्कने 'डायनासोर्सचा बदला घ्या' असं लिहिलं आहे. दरम्यान पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपूर्वी असणाऱ्या डायनासोर्सचा अंत हा असेच लघुग्रह पडल्याने झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लघुग्रहांना रोखून त्यांचा बदला घेऊ शकतो असं मस्कला म्हणायचं असावं... 



कोण आहे एलॉन मस्क?


एलॉन मस्क याचं नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतलं जात. मस्क जगातील अव्वल उद्योजक आणि व्यावसायिक असून टेस्ला आणि स्पेस एक्सचे या दोन्ही कंपनीचा सीईओ देखील आहे. यातील टेस्ला कंपनी गाड्यांची निर्मिती करते. तर स्पेस एक्स कंपनी ही एक एरोस्पेस कंपनी असून आधुनिक विमानं आणि रॉकेट्सचे पार्ट बनवण्याचं काम करते.   


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha