Vodafone Idea : व्हीआयच्या नव्या प्रीपेड प्लॅनमधील सर्वात स्वस्त प्लॅन 99 रुपयांचा आणि सर्वात महागडा प्लॅन 2,399 रुपयांचा आहे. व्हीआयच्या ग्राहकांना 219 रुपयांपासूनच्या प्लॅनपासून पुढे सर्व प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. व्हीआयने ग्राहकांसाठी यामध्ये काही टॉप अप आणि डेटा प्लॅनही आणले आहेत. व्हीआयचे नवे प्रीपेड प्लॅन 25 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे जर तुम्हांला मोबाईल रिचार्जसाठी जास्तीचे पैसे मोजायचे नसतील तर, तुम्हांला 25 नोव्हेंबर आधी मोबाईल रिचार्ज करावा लागेल. 


व्हीआयचे नवे प्रीपेड प्लॅन कसे आहेत जाणून घेऊयात


व्हीआयच्या 149 रुपयांचा प्लॅन आता 179 रुपयांना मिळणार आहे. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस आणि एकून 2 जीबी डेटा मिळणार आहे. तर 219 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 269 रुपये मोजावे लागतील. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 एसएमएस आणि 1 जीबी डेटा मिळेल. व्हीआयच्या 249 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 299 रुपये होणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 एसएमएस आणि 1.5 जीबी डेटा मिळेल. तसेच 299 रुपयांच्या प्लॅनसाठी आता ग्राहकांना 359 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 एसएमएस आणि 2 जीबी डेटा मिळेल. या सर्व प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल.


ग्राहकांना 56 दिवसांचा 399 रुपयांच्या प्लॅनचे दर वाढल्याने हा प्लॅन आता 479 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळेल. यासोबत 56 दिवसांसाठीचा दुसरा 2 जीबी डेटासाठीचा प्लॅन 539 रुपयांना मिळणार आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 एसएमएस मिळणार आहेत. 
तसेच केवळ अनलिमिटेड कॉलिगसाठी व्हीआयचा 459 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल, 1000 एसएमएस आणि एकूण 6 जीबी डेटा मिळणार आहे. याची वैधता 84 दिवस असेल. 
नव्या 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 एसएमएस,1.5 जीबी डेटा मिळणार आहे. 719 रुपयांचा हा प्लॅन आधी 599 रुपयांना होता. 84 दिवसांसाठी असलेला 699 रुपयांच्या शेवटचा प्लॅनची किंमत आता 839 असेल. यामध्येही तुम्हांला अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएसचा लाभ घेता येणार आहे. 


यासह व्हीआयने वार्षिक प्लॅनच्या दरातही वाढ केलीय. 1499 रुपयांचा प्लॅन आता 1799 रुपयांना आणि 2399 रुपयांचा प्लॅन आता 2899 रुपयांना मिळणार आहे.1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस, एकूण 24 जीबी डेटा मिळणार आहे. तर, 2899 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 100 एसएमएस आणि 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha