World Bank Report Pakistan : भारताच्या शेराजी असणारा पाकिस्तान हा देश सध्या मोठ्या संकटात आहे. आर्थिक स्थिती बिकट असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस गरिबी वाढत जात असल्याचा खुलासा जागतिक बँकेच्या अहवालात करण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणात गरिबी कमी झाली आहे. पण पाकिस्तानला मोठ्या आर्थिक समस्यांनी वेढलं आहे.
पाकिस्तानमध्ये गरिबी वाढली
जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, भारताचे विकास मॉडेल विकास आणि गरिबी निर्मूलनावर लक्ष केंद्रित करत आहे. आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे पाकिस्तान दिवसेंदिवस वाढत्या कर्जात बुडत राहिला आहे. दहशतवादाशी संबंधित कारवायांना वित्तपुरवठा देखील येथे वाढत राहिला आहे. आर्थिक परिस्थिती आणि महागाई मोजण्यासाठी जागतिक बँकेने अलीकडेच प्रति व्यक्ती 2.15 डॉलर आणि 3 डॉलर दरम्यान जागतिक दारिद्र्यरेषा निश्चित केली आहे.
भारतात गरिबी कमी झाली
जागतिक बँकेच्या गरिबी आणि सामायिक समृद्धी अहवालानुसार, भारतात 2012 मध्ये अत्यंत गरिबी होती. यावेळी 27.1 टक्के गरिबी होती. आता 2022 मध्ये फक्त 5.3 टक्क्यांवर आली आहे. देशात अत्यंत गरिबीत राहणाऱ्या लोकांची संख्या 2011-12 मध्ये 344.47 लाखांवरुन 2022-23 मध्ये 75.24 लाखांवर आली आहे. म्हणजेच, ती 269 लाखांनी कमी झाली आहे, जी पाकिस्तानच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
पाकिस्ताने कोणाकडून किती कर्ज घेतले?
2017 ते 2021 दरम्यान पाकिस्तानमध्ये अत्यंत गरिबीत जगणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण 4.9 टक्क्यांवरून 16.5 टक्क्यांपर्यंत वाढले. येथे प्रति व्यक्ती प्रतिदिन 4.2 डॉलर्सच्या उत्पन्नावर आधारित एकूण गरिबीचा दर 2017 मध्ये 39.8 टक्क्यांवरून 2021 मध्ये 44.7 टक्क्यांहून अधिक झाला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था इतर देशांकडून मिळालेल्या मदतीवर आणि परदेशी बँकांकडून मिळालेल्या कर्जावर खूप अवलंबून आहे. पाकिस्तानने आयएमएफकडून 44.57 अब्ज डॉलर्सचे 25 बेलआउट पॅकेज घेतले आहेत. याशिवाय, त्याने जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि इस्लामिक विकास बँकेकडून 38.8 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. यासोबतच, पाकिस्तानने चीनकडून 25 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे. त्याच्याकडे 7.8 अब्ज डॉलर्सचे युरोबॉन्ड आणि सुकुक कर्ज देखील आहे. पाकिस्तानला सौदी अरेबिया, युएई आणि पॅरिस क्लबच्या सदस्यांकडूनही आर्थिक मदत मिळाली आहे.
राजकारण आणि अर्थव्यवस्थेत पाकिस्तानच्या लष्कराचा हस्तक्षेप
राजकारण आणि अर्थव्यवस्थेत मोठ्या संख्येने पाकिस्तानी लष्कराचा हस्तक्षेप आहे. पाकिस्तानमध्ये, संसाधनांचे वाटप लष्कराच्या हातात आहे, म्हणून पाठवलेल्या निधीचा लष्कराकडून गैरवापर केला जातो. दहशतवादी नेटवर्क तयार करण्यासाठी वापरला जातो.
महत्वाच्या बातम्या: