Donald Trump Post Viral : डोनाल्ड ट्रम्प हे सध्या त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टमुळे चर्चेत आहेत, ट्रम्प समर्थकांनी 6 जुलै रोजी अमेरिकन कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कारवाई करत त्यांची खाती निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता ट्रम्प यांची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल होतेय. काय आहे सत्य? जाणून घेऊया
सोशल मीडियावर बंदी असूनही डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट होतेय व्हायरल?
सोशल मीडिया अकांऊंट्स निलंबित करण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे संस्थापक इलॉन मस्क यांना आवाहन केले होते की, त्यांना एक स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करावा जिथे त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घालता येणार नाही. दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांची एक सोशल मिडीया पोस्ट व्हायरल होतेय. ट्रम्प यांच्या अकाऊंटवरून कथित ट्विट शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे: "पुन्हा परतलो, धन्यवाद एलोन!" @realDonaldTrump हे हँडल ट्रम्प यांचे वैयक्तिक खाते आहे, जे 6 जानेवारी 2021 रोजी यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर कायमचे निलंबित करण्यात आले होते, तसेच त्यांच्या फोटोसह निळ्या चेक मार्कसह हे अकाऊंट दिसत आहे. कथित ट्विट 15 एप्रिल 2022 ची आहे, परंतु पोस्ट करणारी फेसबुक पोस्ट आदल्या दिवशी प्रकाशित झाली होती, त्यामुळे ही पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांची नसल्याचे समजत आहे.
..तर ते कदाचित ट्विटरवर परत येणार नाहीत.
ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले होते, जर टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी सोशल प्लॅटफॉर्म विकत घेतला आणि त्यांचे खाते पुन्हा सुरू केले तर ते कदाचित ट्विटरवर परत येणार नाहीत. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका फेसबूक पोस्ट्सने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट शेअर केले आहे ज्यामध्ये एलोन मस्क यांना ट्विटरवर पुन्हा सामील होण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
हा दावा खोटा
पण दावा खोटा आहे; कंपनीने पुष्टी केली की अमेरिकेच्या माजी अध्यक्षांवर कथित पोस्ट्सच्या वेळी बंदी घातली गेली होती आणि मस्कला आतापर्यंत सोशल मीडियावर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. ट्विटरच्या प्रवक्त्याने एएफपीला सांगितले की ट्रम्प यांचे जुने अकाऊंट 14 आणि 15 एप्रिल या दोन्ही दिवशी वापरण्यायोग्य नव्हते, तसेच त्यांना या व्यासपीठावर बंदी आहे. त्यामुळे हे ट्विट त्यांचे नाहीच असा दावा केलाय.मस्क, जे टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ आहेत, त्यांनी 14 एप्रिल रोजी टेक जगाला धक्का दिला जेव्हा त्यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी $43 अब्जची बोली लावली आणि व्यासपीठावर भाषण करत स्वातंत्र्याचा प्रचार हा एक मुख्य हेतू असल्याचे नमूद केले . मस्क हे 219 अब्ज डॉलर्स संपत्ती असलेली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानली जाते.