नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा कहर संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. चीनपासून सुरुवात होऊन संपूर्ण जगभरात पसरलेल्या या संसर्गजन्य रोगामुळे चीन आणि इटलीनंतर इराणमध्ये सर्वाधिक बाधित रूग्ण असल्याचं समोर आलं आहे. इराणमध्ये आतापर्यंत 194 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये आतपर्यंत 194 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लोकांना घरामध्येच राहावं लागत आहे. तर इटलीमध्ये सार्वजनिक ठिकाणांमवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान भारतामध्ये आतापर्यंत 46 लोकांना संसर्ग झाला आहे.
जेलमधून 70 कैद्यांना सोडलं
इराणने जेलमध्ये कैद असलेल्या 70 हजार कैंद्यांना सोडून दिलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, कैद्यांना सोडण्यात आलं आहे. इराणमध्ये न्यायिक मुखिया इब्राहिम रईसीने सांगितल्यानुसार, समाजामध्ये असुरक्षिततेची भावना उत्पन्न होऊ नये यासाठी असं करण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या कैद्यांना कोरोनाचा कहर थांबल्यानंतर पुन्हा जेलमध्ये कैद करण्यात येणार आहे. परंतु, इब्राहिम रईसी यांनी सांगितलं की, यांना जेलमध्ये पुन्हा कधी कैद करण्यात येईल, हे अद्याप निश्चित नाही. याआधीही कोरोनामुळे काही जेलमधून कैद्यांना सोडण्यात आलं होतं.
Coronavirus | राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात
भारतीय वायुसेनाचं विमान सोमवारी रात्री इराणला पाठवण्यात आलं होतं. हे विमान इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. इराणमध्ये जवळपास दोन हजार भारतीय होते. मागील काहि दिवसांपासून कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
भारतात कोरोना बांधितांची संख्या 55
केरळमध्ये कोरोनाबाधित अजून 6 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळं केरळमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 वर जाऊन पोहोचलाय. तर कर्नाटकातही कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळं भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 55 वर गेलाय.
भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या आतापर्यंत 55 झाली आहे. पुण्यातही कोरोनाचे दोन संशयित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधित दोन्ही रुग्ण फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात 40 जणांच्या ग्रुपसोबत दुबईला गेले होते. त्यानंतर पुण्यात आल्यावर गेल्या 15 दिवसात ते कुठल्या भागात गेले, याची माहिती घेतली जात आहे. या दोघांच्या कुटुंबातील तीन सदस्यांची चाचणी करण्यात आली आहे, त्याचे रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येतील. दोन्ही व्यक्तींसोबत दुबईमध्ये गेलेल्या एकूण 40 व्यक्तींची नावं आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्यानुसार सर्वजण विविध जिल्ह्यातील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करत आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus |देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, संख्या 43 वर