US News : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल यूएस ब्लड टेस्टिंग कंपनी थेरानोसची (Theranos) संस्थापक एलिझाबेथ होम्स (Elizabeth Holmes) यांना न्यायालयाने 11 वर्षे, तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एलिझाबेथने वयाच्या 19 व्या वर्षी थेरानोस कंपनीची सुरुवात केली आणि ती जगातील सर्वात तरुण महिला अब्जाधीश बनली. त्याच वेळी, 2018 मध्ये, थेरनोस स्टार्टअप पूर्णपणे बंद झाला. एलिझाबेथ यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 


गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक


एलिझाबेथ होम्स यांनी अमेरिकेत रक्त तपासणीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे वचन दिले. या नावाखाली त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कॅलिफोर्नियातील न्यायाधीश एडवर्ड डेव्हिला यांनी होम्सला गुंतवणुकदारांच्या फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांमध्ये आणि कट रचल्याच्या एका गुन्ह्यात शिक्षा सुनावली. तीन महिन्यांच्या खटल्यानंतर न्यायालयाने 38 वर्षीय होम्सला दोषी ठरवले. माहितीनुसार, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान होम्स रडल्या आणि म्हणाल्या की, त्या अपयशामुळे निराश झाल्या आहे. न्यायालयाने संधी दिली असती तर त्यांनी अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या.


सर्व दावे खोटे ठरले


होम्सने एक स्टार्टअप सुरू केले होते. थेरानोस कंपनीच्या नावाने ब्लड एनालाइजर विकसित केले आहे, जे कुठेही घेऊन जाता येऊ शकते, या मशिनच्या साहाय्याने रक्त तपासणी सहज होणार आहे. यंत्राच्या साहाय्याने बोटातून रक्त घेऊन सर्व तपासण्या करता येतात. त्या व्यवसायासाठी बरेच गुंतवणूकदार मिळाले. नंतर होम्स यांचे सर्व दावे खोटे ठरले. आणि अनेकांची फसवणूक झाल्याचे आढळले


2018 मध्ये कंपनी बुडाली


होम्सवर खटला चालवणारे यूएस सरकारी वकील यापूर्वी 15 वर्षांचा तुरुंगवास, $800 बिलीयनपेक्षा जास्त दंडाची मागणी करत होते. माहितीनुसार, होम्स सिलिकॉन व्हॅली स्टार बनली, जेव्हा त्यांनी रोग शोधणारे उपकरण विकसित केल्याचा दावा केला. त्यावर रक्ताचे काही थेंब टाकल्यास सर्वात मोठा आजार पटकन ओळखला जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. नंतर त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. 2018 मध्ये त्यांची कंपनी बुडाली. अहवालात असे म्हटले आहे, की तिच्या दाव्यांमुळे थेरोनॉस कंपनीला जवळपास एक अब्ज डॉलर्स उभारण्यास मदत झाली. दुसरीकडे, होम्सच्या वकिलाने त्याच्या शिक्षा कमी करण्याचे आवाहनही केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


Twitter New Policy : Twitter वर व्देषपूर्ण आणि बनावट ट्विट करणं पडणार महागात, जाणून घ्या ट्विटरची नवी पॉलिसी!