UPDATE : 56 प्रवासी आणि 10 केबिन क्रू सह पॅरिसहून कैरोला जाणारं इजिप्तएअरचं विमान क्रॅश झाल्याचं वृत्त आहे. इजिप्तएअर फ्लाईट क्रमांक MS804 बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली होती, त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सिस ओलांद यांनी विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

भूमध्य सागरात विमान कोसळलं असून त्याच्या अवशेषांचा शोध सुरु आहे. दरम्यान विमान कोसळण्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून तांत्रिक कारणांसोबतच दहशतवादी हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

 

 

कैरो : 66 जणांसह पॅरिसहून कैरोला जाणारं इजिप्तएअरचं विमान रडारवरुन गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. इजिप्तएअर फ्लाईट क्रमांक MS804 बेपत्ता झाल्याचं कंपनीतर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. हे एअरबस A320 बनावटीचं आहे.

 
विमान 37 हजार फूट उंचीवरुन उडत असताना भूमध्य समुद्रावरुन बेपत्ता झाल्याचं एअरलाईनतर्फे सांगण्यात आलं आहे. पॅरिसच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 9 मिनिटांनी विमानाने उड्डाण केलं. पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी हे विमान लॅण्ड होणं अपेक्षित होतं, मात्र 2 वाजून 45 मिनिटांनी विमानाशी संपर्क तुटला.

 

 

https://twitter.com/EGYPTAIR/status/733170231892430848

 

https://twitter.com/EGYPTAIR/status/733170279829151744
विमानात 56 प्रवासी आणि 10 केबिन क्रू आहेत. यापैकी 15 फ्रेंच, 30 इजिप्तचे नागिरक आहेत. इजिप्तएअरतर्फे कैरो विमानतळाजवळ प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी डॉक्टर, दुभाषांची सोय केली आहे, तसेच वेळोवेळी अपडेट्स दिले जात आहेत. इजिप्त नौदलाने सध्या शोध आणि बचाव मोहिम हाती घेतली आहे.

 

https://twitter.com/EGYPTAIR/status/733170840364326913