मात्र डिलीट होण्याआधी हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. 31,700 युझर्सनी हा फोटो शेअर केला आहे. परंतु हा फोटो चुकीचा आहे की वडील-मुलामधील सुंदर क्षण या फोटोत दाखवला आहे, यावर या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
हा फोटो मुलाच्या आईने पुन्हा पोस्ट केला. फोटोखाली लिहिलेल्या स्पष्टीकरणात तिने लिहिलं आहे की, "माझा मुलगा फॉक्सला सॅलमोनेला पॉयझनिंग नावाचा आजार आहे. यामुळे त्याला अतिसार, ताप आणि पोटदुखीचा त्रास होतो. मुलाचा ताप नियंत्रणात ठेवण्यासाठी वडील त्याला मांडीवर घेऊन शॉवरखाली बसले. फॉक्स त्याच्या वडिलांच्या मांडीवर अतिशय शांतपणे बसला होता. तो क्षण कॅमेऱ्यात टिपावा, असं वाटल्याने मी फोटो काढला आणि फेसबुकवर शेअर केला."
तर या फोटोमधून नग्नता दिसते असं कारण सांगत फेसबुकने हा फोटो हटवला आहे.