तुर्की आणि ग्रीसमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्वेक्षणानुसार (यूएसजीएस) पश्चिम इजमीर प्रांताच्या किनाऱ्यापासून सुमारे 17 कि.मी. अंतरावर 7.0 रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचे हादरे बसले आहेत.




भूकंपामुळे चार जणांचा मृत्यू आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तुर्कीचे आरोग्यमंत्री म्हणाले की इजमीरमध्ये भूकंपात आमच्या 4 नागरिकांची मृत्यू झाला. या घटनेत एकूण 120 लोक प्रभावित झाले आहेत. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका व हेलिकॉप्टरचे सहाय्य घेतले जात आहे. आम्ही इजमीरच्या लोकांबरोबर आहोत.


जानेवारीमध्ये तुर्कीच्या सिव्रीस येथे झालेल्या भूकंपात 30 हून अधिक लोक ठार तर 1600 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यापूर्वी 1999 साली तुर्कीच्या इजमित शहरात भूकंपात 17000 नागरिक ठार झाले होते.