Dutch MP on Nupur Sharma : आखाती देशांसह विविध मुस्लिम देशांमध्ये, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचा प्रेषित पैगंबरासाठी निषेध करण्यात येत असताना, नेदरलँडचे (Netherland) खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी उघडपणे त्यांचे समर्थन केले आहे. गीर्ट वाइल्डर्स म्हणाले की, भारतीय नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबद्दल सत्य सांगितल्याने अरब आणि इस्लामिक देश संतापले, हे अतिशय हास्यास्पद आहे. ते म्हणाले, याप्रकरणी भारताने माफी का मागावी? त्यांनी भारतीयांना नुपूर शर्माचा बचाव करण्याचा सल्ला दिला. 


नेदरलँडचे खासदार गर्ट वाइल्डर्स काय म्हणाले?


नेदरलँड्सचे खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी ट्विट केले की, 'माझ्या भारताच्या मित्रांनो, तुम्ही मुस्लिम देशांच्या धोक्यात येऊ नका. स्वातंत्र्यासाठी उभे राहा आणि प्रेषितांबद्दल सत्य बोलणाऱ्या तुमच्या नेत्या नुपूर शर्माचा बचाव करण्यात अभिमान बाळगा. या ट्विटनंतर गिर्ट वाइल्डर्स यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यावर ते म्हणाले की, मला पाकिस्तानपासून तुर्कस्तानपर्यंत धमक्या दिल्या जात आहेत, मात्र या धमकीने काहीही साध्य होणार नाही. मी सत्य सांगणे थांबवणार नाही.


 






 


प्रेषित मोहम्मद पैंगबरांवर केलेल्या टिप्पणीवर मुस्लिम देशांची टीका
यापूर्वी कतार, कुवेत, पाकिस्तान, इंडोनेशियासह 10 हून अधिक मुस्लिम देशांनी पैगंबरावर केलेल्या वक्तव्यावर टीका केली होती. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा सौदी अरेबियानेही निषेध केला आहे. सौदी अरेबियाच्या डायलॉग कमिटी एसपीएच्या मते, परराष्ट्र मंत्रालयाने नुपूर शर्माच्या वक्तव्यावर टीका केली आणि जाहीरपणे निषेध केला, "परराष्ट्र व्यवहार मंत्रालय प्रेषित मोहम्मद यांचा अपमान करणार्‍या टिप्पणीबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्याचा निषेध करतो" 


संबंधित बातम्या


Prophet Muhammad : भाजपतून निलंबनानंतर नुपूर शर्मा यांच्यावर अटकेची टांगती तलवार, मुंबई पोलीस समन्स बजावणार


मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा जगातील 'या' देशांकडून निषेध; भारतीय उत्पादनांवर बंदी