Controversial Remark On Prophet Mohammad : भाजपने (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं निलंबन केलं आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Mohammad) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपनं त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आता नुपूर शर्मा यांना समन्स (Summon) बजावण्यात येणार आहे. नुपूर शर्मा यांच्या विरोधात रझा अकादमीने एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला.
AIMIM चे नेते ओवेसी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) आणि मुस्लिम समाजाशी संबंधित संघटनांनी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारीही सुरू झाली आहे. मुंबई पोलीस लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावणार आहेत. काही दिवसांपूर्वी रझा अकादमीने मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्यात नुपूर शर्माविरोधात गुन्हा दाखल केला होता.
धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप रझा अकादमीने तक्रारीत केला आहे. याशिवाय नुपूरयांच्या विरुद्ध ठाण्यातील मुंबा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डानेही या मुद्द्यावर नुपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर या मुद्द्यावरून AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान सर्व स्तरातून याला विरोध होत असतानाच साध्वी प्राची यांनी उघडपणे नूपूर यांचं समर्थन केलं आहे.
काय वाद आहे?
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील लोक संतप्त झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी म्हटलं होतं की, हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नुपूर शर्मा यांनी इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून धमक्या मिळत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Nupur Sharma : टीव्ही वाहिनीवरील चर्चेत आक्षेपार्ह वक्तव्य; भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मांविरोधात मुंबई एफआयआर दाखल
- मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा जगातील 'या' देशांकडून निषेध; भारतीय उत्पादनांवर बंदी
- भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्याने कतार, बहरीनमध्ये संताप; जाणून घ्या आखाती देश भारतासाठी महत्त्वाचे का?