BJP Leader Controversial Statement : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या दोन नेत्यांच्या कथित टिप्पणीवरून आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे. इस्लामिक देशांमध्ये भारताला विरोध होताना दिसत आहे. मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य के केल्याबद्दल भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले, तर नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी जरी केली असली, तरी देशात आणि आखाती देशांमध्ये त्यांच्या विरोधात सुरू झालेला गोंधळ थांबताना दिसत नाही. विरोधकही भाजपवर हल्लाबोल करत असून त्यांना तुरुंगात पाठवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. सत्ताधारी पक्षाला देशांतर्गत अधिक टीकेला सामोरे जावे लागत असून त्याचे परिणामही दिसून येत आहेत.
वक्तव्याविरोधात आखाती देशांमध्ये खळबळ
इराण, कुवेत, कतार आणि पाकिस्तानसह अनेक देशांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भारतीय राजदूताला बोलावले. जाणून घ्या जगातील किती देशांनी या टिप्पणीवर आक्षेप घेतला आणि भारतीय उत्पादनांवर कोणी बंदी घातली.
कोणत्या देशांनी विरोध केला?
कतार
इराण
इराक
कुवेत
इंडोनेशिया
सौदी अरब
संयुक्त अरब अमिरात
बहरीन
अफगाणिस्तान
पाकिस्तान
जॉर्डन
ओमान
लिबिया
मालदीव
इस्लामिक कोऑपरेशनच्या 57 सदस्यीय संघटनेकडून निषेध
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुस्लिम देश सातत्याने आक्षेप घेत आहेत. कतारने रविवारी सर्वप्रथम आपली नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर कुवेत, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तानसह सुमारे 15 देशांनी भारतावर आक्षेप घेतला आहे. 57 सदस्यीय इस्लामिक कोऑपरेशन (OIC) संघटनेनेही पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. ओआयसीने संयुक्त राष्ट्रांना भारतातील मुस्लिमांना हक्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. ओआयसीने संयुक्त राष्ट्रांना भारतातील मुस्लिमांना हक्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
भारतीय उत्पादनांवर बंदी
काही अरब देशांनी त्यांच्या सुपर स्टोअरमध्ये भारतीय उत्पादनांवर बंदी घातली आहे. कुवैतीच्या एका सुपरमार्केटने भारतीय उत्पादने आपल्या शेल्फमधून काढून टाकली. कुवेत शहराच्या अगदी बाहेर सुपरमार्केटमध्ये, तांदळाची पोती आणि मसाले आणि मिरचीचे शेल्फ प्लास्टिकच्या आवरणाने झाकलेले होते. तिथे अरबी भाषेत लिहिले आहे की, ‘आम्ही भारतीय उत्पादने काढून टाकली आहेत.’ कुवेतशिवाय सौदी अरेबिया आणि बहरीनमध्येही भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला होता.
भारत सरकार काय म्हणाले?
वाद कमी करण्याच्या प्रयत्नात, कतार आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, राजदूतांनी असे व्यक्त केले आहे की "ट्विट्स कोणत्याही प्रकारे भारत सरकारचे विचार प्रतिबिंबित करत नाहीत. हे उपेक्षित घटकांचे विचार आहेत."
काय म्हणाले भाजप?
नुपूर शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात, भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक म्हणाले, "तुम्ही विविध विषयांवर पक्षाच्या भूमिकेबद्दल उलट मत व्यक्त केले आहे, जे पक्षाच्या घटनेच्या नियम 10(अ) चे स्पष्ट उल्लंघन आहे. पुढील तपास प्रलंबित असल्याचे सांगत, तुम्हाला याद्वारे पक्षातून आणि तुमच्या जबाबदाऱ्यांमधून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
नुपूर यांची निवेदन जारी करून माफी
मात्र, यानंतर नुपूर शर्माने ट्विटरवर एक निवेदन जारी करत पैगंबर मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल माफी मागितली आहे. नूपुरने लिहिले की, “गेल्या अनेक दिवसांपासून मी टीव्हीवर वादविवाद करत होते, जिथे माझ्या आराध्य शिवजींचा दररोज अपमान केला जात होता. हे शिवलिंग नसून कारंजे आहे, असे माझ्यासमोर बोलले जात होते. दिल्लीच्या प्रत्येक फूटपाथवर अनेक शिवलिंगे पाहायला मिळतात. जा आणि पूजा करा. आपल्या महादेव शिवजींचा असा वारंवार माझ्यासमोर केलेला अपमान मला सहन झाला नाही आणि मी रागात काही गोष्टी बोललो. माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेते. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू कधीच नव्हता.